अनेकदा डोकेदुखी, पोटदुखी, स्नायूंमध्ये वेदना किंवा अंग दुखण्याचा त्रास होतो. यावर उपाय म्हणून पेन किलर घेणे पसंत केले जाते. परंतु, यामुळे जेवढ्या वेगाने तुमचे दुखणे कमी करते त्याच वेगाने ते शरीराला नुकसानही पोहचवते. यामुळे दुखण्यावर परिणामकारक तात्पुरता उपाय करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला एक उपाय सांगत आहोत, तो म्हणजे…
हळदीचा चहा
सौंदर्यात भर पाडणारी हळद आरोग्यासाठीही तितकीच फायदेशीर आहे. हळदीच्या सेवनाने अनेक रोगांपासून सुटका व संरक्षण होते. प्रत्येक दुखण्यावर हळद उपयोगी ठरते. हळदीचा चहा पिल्याने दुखणे कमी होते. पाहा तो करा करायचा…
कृती
प्रथम एका पातेल्यात 4 कप पाणी घ्या. हे पाणी उकळायला लागल्यावर त्यात 1चमचा हळद मिसळून 15-20 मिनिटे उकळू द्या व नंतर 1 आल्याचा तुकडा त्यात टाका. आता पुन्हा 15 मिनिटे उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करून एका कपात गाळून घ्या. यामध्ये चवीनुसार लिंबू व मध घाला. हा चहा घेतल्यावर थोड्याच वेळात दुखण्यापासून आराम मिळेल.
डॉ.जितेंद्र घोसाळकर
धन्वंतरी गोपियुश उपचार
७७९८६१७२२२
Leave a Reply