नवीन लेखन...

हळदीचे कुंकू

मी एक गोष्ट ऐकली ती अशी,एक फॉरेस्ट ऑफिसर नवीन लग्न झालेला जंगलातील कॉर्टर मध्ये राहत होता. त्याच्या बायकोला ब्लीडींगचा त्रास झाला, रक्त थांबत नव्हते, डॉक्टरांनी सांगितले आठ दिवसांची सोबतीण आहे. काय तिच्या इच्छा असतील त्या पूर्ण करा. तो हताश झाला होता. एक पागोटेवाला म्हातारा आला, त्याला म्हणाला तुझी बायको आजारी आहे ना? मी सांगतो ते कर ऑफिसर ने विचार केला ऐवी तेवी बायको मरनार, चला करून पाहू. म्हाताऱ्याने केळी  आनन्यास सांगितले. त्यांनी केळी  आणली. एक केळ  सोलून फाकवुन त्यात पिंजर (हळदीचे कुंकू ) घातले. आणि ते केळ  त्याच्या बायकोला खाण्यास दिले. असे २-३ वेळा दिले. ब्लीडींग थांबले आणि दोन दिवसात ती बायको घरात काम करू लागली.

गोष्ट  ऐकल्यावर माझ्या मनात विचार सुरू झाले, पूर्वी लहानपणापासून मुलींना कुंकू लावायची आपल्याकडे पद्धत होती. कपाळावर कुंकू लावतात तेथे अक्युप्रेशर पिच्युटरी ग्लॅन्ड चा पॉईंट आहे तसेच तिथे आज्ञा चक्रही येते. तिथे हळदीचे कुंकू लावले की कुंकवातील द्रव्य तिथे अबसॉरब होऊन पिच्युटरी ग्लॅन्ड ऍक्टिव्ह होते. त्यामुळे हार्मोन सिक्रीशन नीट होते. त्यामुळे पूर्वी बायकांना पाळीचे त्रास कमी होते.

मी हळदीचे कुंकवाचे टिंक्चर करून ते होमीओपॅथी पद्धतीने सूक्ष्म करून साखर केली व पाळीचा त्रास असलेल्या स्त्रियांना दिले. त्यांची ३-६ महिन्यात पाळी नॉर्मल होऊ लागली. कुंकवाच्या गोळ्या करून दिल्या, ४ दिवसानंतर होणारे ब्लीडींग थांबले.

आमच्या पूर्वजांनी बायकांनी कुंकू लावायचे ही प्रथा पडून बायकांचे आरोग्य सांभाळले, धंदा केला नाही.

कुंकू हे हळदीपासून तयार केलेले असावे. टिकली लावून उपयोग होत नाही. ज्या शिकलेल्या, फॉर्वर्ड बायकांना कुंकू लावण्याची लाज वाटते किंवा कमीपणाचे वाटते. त्यांनी रात्री झोपताना कुंकू पाण्यात कालवून औषध म्हणून लावावे.

शुद्ध कुंकू कसे ओळखावे – १] कुंकवाला हळदीचा वास येतो. २] थोडे कुंकू हातावर घेऊन त्यावर ओला चुना चोळला तर काळे होते. त्यात रंगाची भेसळ असेल तर रंग लाल राहतो.

अरविंद जोशी
९४२१९४८८९४

Avatar
About अरविंद जोशी 41 Articles
अरविंद जोशी हे naturopathy & pranik healing चे गाढे अभ्यासक आहेत. त्यांचा फुलांवरही खूप अभ्यास आहे. ४० वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. आज वयाची ७० वर्षें असुनही मुद्दाम what's app शिकून घेतले आहे. सेवाभाव म्हणून ते WhatsApp ग्रुपसाठी काम करतात.

3 Comments on हळदीचे कुंकू

  1. अरविंद जोशी यांनी तयार केलेले ते औषध किंवा original कुंकू मला मिळेल का? कृपया माहिती द्यावी .

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..