कंबरेस दाबसी कां ?
निश्चल उभा, ना हलतां
कुठे तुझा कंबरपट्टा ?
Belt कुठे विठ्ठला तुझा ?
सर्व जगीं, सार्या जागीं
चालत आहे घुसखोरी
नुरे अन्य स्थानचि तुजसी
एक फक्त वीटच उरली .
जगीं फार पाप वाढे
तें तुला खपावें कैसें ?
म्हणुन कटीवर कर ठेवुन तूं
उभा , जाब पुसण्यांस , विठू ?
विठू, कुणां शत्रूपासुन तूं
वाचवायला डोक्याला
मुगुट नामक, शिवबांजैसा
जिरेटोप चढवलास हा ?
ऊन नि पाऊस यांच्यापासुन
रक्षण मुगुट करीलच की
पण, क्रिकेट्-कॅप्सारखा त्याला
पुढील बाजुस flap कां नाहीं ?
सज्जन आणिक भक्तांचा
करशीलच उद्धार
दुष्टांच्या माथ्यावर तूं
ती वीट फेकुनी मार.
– सुभाष स. नाईक
Leave a Reply