१९९३-९४ च्या सुमारास भारतात डिजिटल क्रांती वाढू लागली घराघरात “इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे पेव फुटू लागले. खेळणी देखील याला अपवाद नव्हती. अर्थात चावी फिरवून डोलणार्या बाहुल्या, बाहुले, रोबोट्स तर एव्हाना खूप जुने झालेले, दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सुद्धा अॅनिमेशन बर्यापैकी रुळलेली, त्यामुळे कार्टुन्सचा आनंदही तेव्हांच्या लहानग्यांना घेता येत असे. पण आणखीन एक सोकॉल्ड “ व्हिडिओ गेम्स” नावाची क्रांतीकारक व आधुनिक क्रीडा प्रकार हाताच्या बोटावर टक, ट्रिक, टुक असे आवाज ऐकवत व तितक्याच चित्तथरारक आवेषात सर्वांना पुढे रहाण्यासाठी अप्रत्यक्ष इशारे देत राहिला. असे हे छोटे व्हिडिओ गेम २ इंच x ३ इंच या आकाराचे, घरातील आपल्या दूरचित्रवाणीच्या आकारासारखे यामध्ये विविध गेम्स असायचे, जसं की बाईक रेस, कार रेस, मानवी रेस, इत्यादी, हे गेम्स सुरुवातीला “ब्लॅक अॅण्ड व्हाईट” स्क्रीन मध्ये उपलब्ध होते. बाजुला उजवी-डावीकडे वळवण्यासाठी बटण, मधोमध एखाद् दुसरं चौकोनी अथवा गोलाकार स्वरुपात; स्टार्ट टु एण्ड पॉइंट न चुकता टप्पे पार केले की पॉइंट्स मिळत. आनि मग ते मिळवण्यासाठी जी एनर्जी लावावी लागत ती सुद्धा श्वास रोखून धरण्यासारखी असायची.
“हॅण्ड व्हिडिओ गेम्स”
१९९५ ला “ब्रीक गेम्स” आले, आकाराने थोडे मोठे, आवाजात विविधता, आणि खेळात पर्याय उपलब्ध होत. या ब्रीक गेम्स चा आकार साधारणत: “अॅण्ड्रॉइड टच स्क्रीन फोन” एवढा आणि आज “अॅण्ड्रॉइड फोन” वापरणार्याची शान किंवा भाव खाऊन जाणारा आहे, तितकीच २० वर्षांपूर्वी या ब्रीक गेम्स खेळणार्या मुलांची होती. कधी कधी शाळेत विद्यार्थी असे हे “ब्रीक” आणि “व्हिडिओ गेम्स” टाईम पास साठी आणत. जर का शिक्षकांच्या निदर्शनास असे गेम्स आढळले तर मात्र त्या विद्यार्थ्यांची खैर नसायची. तो व्हीडिओ गेम ताबडतोब हे शिक्षक काढून घेत असत व शिक्षा ही मिळत असे, ती वेगळीच. शिवाय “तुमच्या पालकांना याबाबत कळवा त्याशिवाय वर्गात प्रवेश मिळणार नाही असा दम मिळतअसे.” विद्यार्थ्याचं संपूर्ण लक्षच त्या व्हीडिओ गेमवर कारण दोन-चारशे रुपये त्याकाळी खूप असायचे या स्थितीत जर त्या व्हीडिओ गेम ला कोणी हात लावला किंवा तो पडला तर जीव अगदी वर-खाली होत असत.
व्हीडिओ गेम्स ही “इन्डोर डिजिटल गेम्स” ची संकल्पना तर होती. पण याच “व्हीडिओ गेम्स” मुळे मुलांचं कीडांगणात आणि मैदानात वावरणं कमी झालं, एकाच जागी बसून काहीतरी आगळं वेगळं खेळण्याची संधी त्यांना मिळत असल्यामुळे सहाजिकच कमी जागेत खेळ तरी कोणता खेळणार असा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे डिजिटल गेम्सचा पायंडा पडला.
“हॅण्ड व्हीडिओ गेम्स” खरं म्हणजे डिजिटल-अॅनिमेटेड गेम्सचा उदय होता; तसंच संगणकाचा सुद्धा त्याच काळात उदय झाल्यामुळे विविध गेम्स येथे ही खेळता येण्यासारखे आहेत हे देखील माहिती पडलं, मग संगणकावरही हळूहळू टप्या टप्याने गेम्सची संख्या वाढतच गेली; रंगीत टीव्हीवर सुद्धा अशा गेम्सची सोय हमखास करुन दिली जाते.
आज अनेक सोशल नेटवर्किंग साईट्सचा उदय झालेला दिसतो, स्मार्ट फोन्स यामध्ये तर गेम्सचे पर्याय तर आहेतच पण “प्लेस्टोर” मधून ही आपण आवडीचे गेम डाऊनलोड करु शकतो आणि ते ही विनाशुल्क. याच व्हीडिओ गेम्स चं वार्षिक उत्पन्न काही शेकडो कोटींमध्ये गेलेलं आहे, या क्षेत्रात करियर केलेल्याची संख्या ही कमी नाही हं !पण याचं श्रेय पहिल्यांदा जातं ते म्हणजे “हॅण्ड व्हीडिओ गेम्स” ना, आज मोबाईल फोन्स वर खेळतानाची मजा ही अनोखी आहेच अशीच मजा किंवा त्याही पेक्षा कित्येक पटीची मजा, व्हीडिओ गेम्स वर खेळताना यायची हे ही विसरता येण्यासारखं नाही. त्यामुळे असे गेम्स जे कोण खेळले, त्यांना संगणकीय आणि “टेक्नो इक्वीप्ड” काळातही जुन्या व्हर्जन्सच्या व्हीडिओ गेम्स ची आठवण आल्या वाचून रहात नाही.
Leave a Reply