नवीन लेखन...

हनुमान जयंती

राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून अग्नीदेव प्रसन्न झाला आणि त्यांनी दशरथाच्या राण्यांना पायस, म्हणजेच खिरीचा प्रसाद दिला. दशरथ राजाच्या राण्यांप्रमाणेच तपश्च र्या करणार्याय अंजनीला म्हणजे मारुतिरायाच्या आईलाही हा प्रसाद मिळाला. त्यामुळे अंजनीला मारुतिरायासारखा पुत्र लाभला. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. मारुतिरायाने जन्मतःच उगवता सूर्य पाहिला आणि त्याला ते फळ आहे, असे वाटून त्याने सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. त्या वेळी सूर्याला गिळण्यासाठी राहू आला होता. इंद्रदेवाला मारुति राहूच आहे, असे वाटले आणि त्याने मारुतीच्या दिशेने वज्र फेकले. ते मारुतिरायाच्या हनुवटीला लागले आणि त्याची हनुवटी छाटली गेली. तेव्हापासून त्याला हनुमान हे नाव पडले.

हनुमानाची दैवत म्हणून उपासना होत असली, हनुमान जयंती साजरी होत असली तरी हनुमानाबद्दल तपशीलवार माहिती असतेच असं नाही.

हनुमानाला मारुती, महावीर, बजरंगबली, अंजनेय, महारुद्र, पवनपुत्र अशा अनेक नावांनी संबोधिले जाते. व्युत्पत्ती : वैदिक साहित्यात कुठेही हनुमानाचा उल्लेख नाही.

हनुमंत हा शब्द तमिळचे संस्कृत रूप असावे असे पार्जीटर, डॉ. सुनीतीकुमार चतर्जी, शिवशेखर मिश्र इ. अभ्यासकांचे मत आहे. द्रविड शब्दाचे संस्कृत रूप बनविताना बहुतेक प्रारंभी ‘ह’कार जोडण्याची पद्धती आहे. तमिळ आणमंदि (आण= वानर, मंदि= नर) शब्दाचे संस्कृतीकरण म्हणजे हनुमंत होय. तमिळमध्ये अनुमंद असे म्हणतात. म्हणजे संस्कृतातील हाकार इथे लोप पावतो. अनुमान (तमिळ), हनुमंथूडू (तेलगु), अनोमन (इंडोनेशियन), अन्दोमान (मलेशियन) आणि हुंलामान (लाओस) अशी विविध नावे आहेत. परंतु विसाव्या शतकातील भाषाशास्त्री मरे इमानु जे द्राविडी भाषांचे तज्ज्ञ आहेत, त्यांचे असे मत आहे की, संगम साहित्यानुसार मंदि हा शब्द फक्त वानरीला उद्देशून वापरला जातो; वानराला नाही. केमिली बुल्के त्यांच्या ‘रामकथा: उत्पत्ती आणि विकास’ या ग्रंथात म्हणतात की मध्य भारताच्या आदिवासी जमातीत हनुमानाचे मूळ सापडते. छोटा नागपूरमध्ये राहणाऱ्या उरांव व मुंड या आदिवासींमध्ये तिग्गा, हलमान, बजरंग व गडी अशी गोत्रे आढळतात. या सर्वाचा अर्थ वानर असा आहे. त्याचप्रमाणे रेद्दी, बरई, बसौर, भना व खुंगार या जातींमध्येही वानरसूचक गोत्रे आहेत. सिंगभूममधले भूईया जातीचे लोक आपण हनुमंताचे वंशज असल्याचे सांगतात. यावरून हनुमान आदिवासी जमातीचा देव असावा असे वाटते.

हनुमानाची विविध नावं : अंजनेय, अंजनीपुत्र, केसरीनंदन, मारुतीनंदन, पवनपुत्र इ.

हनुमानाच्या विविध उपाधी : रामरक्षेत हनुमानाची विविध विशेषणे सांगितली आहेत. ती अशी-मनोजवं, मारुततुल्यवेगम्, जितेन्द्रियं, बुद्धीमतावरिष्ठम्, वानरयुथमुख्यं, श्रीरामदूतं इ.

हनुमानाचे जन्मस्थान.

कर्नाटकातील हम्पी येथील अंजनेय पर्वत.

गुमला येथून १८ किमीवरील अंजन नावाचे खेडे

नाशिक जिल्ह्य़ातील त्र्यंबकेश्वरपासून सात किमीवरील अंजनेरी पर्वत

अंजन्धामानुसार, राजस्थानातील चुरू जिल्ह्य़ातील सुजानगढजवळ लक्षका पर्वत.

पुरी धामानुसार, भुवनेश्वरजवळ खुर्द येथील दाट जंगल.

हनुमंताला संगीतशास्त्राचा एक प्रवर्तक मानतात. संगीत् पारिजात (१.९), संगीत् रत्नाकार (१,१७) इ. ग्रंथांतून प्राचीन संगाचार्याबरोबर अन्जानेयाचा उल्लेख येतो. आंजनेय् संहिता अथवा हनुमानत्संहिता या ग्रंथाचा उल्लेख तंजौरच्या रघुनाथ नामक राजाने आपल्या ‘संगीत् सुधा’ ग्रंथात केला आहे. संत रामदासांनी त्याची गायनी कला ध्यानात घेऊन त्याला संगीतज्ञानमहानता असे संबोधले आहे.

हनुमान आणि रुद्र : हनुमानाला रुद्राचा अवतार मानतात. पुराणकाळात हे नाते विकसित झाले. स्कंद पुराण (अवंतीखंड ८४), ब्रह्मवैवर्त पुराण (कृष्णजन्मखंड ६२), नारदपुराण (पूर्वखंड ७९), शिवपुराण (शातारुद्रसंहिता २०), भविष्यपुराण (प्रतिसर्ग पर्व १३०), महाभागावात्पुरण (३७) इ.ठिकाणी रुद्र व हनुमान हे नाते स्पष्ट केले आहे. हनुमानाची एकादश रुद्रांत गणना होते. भीम हे एकादश रुद्रांतील एक नाव आहे. म्हणूनच समर्थानी त्याला भीमरूपी महारुद्र म्हटले आहे. हनुमानच्या पंचमुखी मूíत रुद्रशिवाच्या पंचमुखी प्रभावातून आली आहे.

रामायणातून नि राम परंपरेतून दिसणारा पराक्रमी, बुद्धिमंत, रामभक्त हनुमान आणि लोकपरंपरेतून दिसणारा रुद्रावतार, शनीशी साधम्र्य दाखवणारा, यक्षोपासनेशी जवळीक साधणारा, तंत्रोपासनेतही असणारा हनुमान. साधारण उत्तर भारतात वैष्णव परंपरेतला दास-हनुमान आणि लोक परंपरेतला वीर हनुमान प्रकर्षांने जाणवतो तर महाराष्ट्रात समर्थ परंपरेतला हनुमानाचा पगडा जाणवतो. असे असले तरीही महाराष्ट्रात लोक परंपरेतला हनुमानही आपले अस्तित्व टिकवून आहे. हनुमान ही लोकमान्य, आपली वाटणारी देवता आहे. त्यामुळे तिची बलोपासना आणि संकटमोचन प्रतिमा आजही तरुण भजतात हे जाणवते.

हनुमान जयंतीला चणे-गूळ एकत्र करून देण्याची पद्धत असते. हरभरे भाजून त्याचे चणे तयार केले जातात. यालाच फुटाणे असेही म्हणतात. चांगल्या प्रतीच्या हरभऱ्यापासून बनविलेले फुटाणे किंवा फुटाणे सोलून तयार केलेले डाळे हे रुचकर तर असतातच; पण पौष्टिकही असतात. अतिप्रमाणात घाम येणे, अनुत्साह वाटणे, कफदोष वाढल्यामुळे अंगाला जडपणा येणे, अकारण थकवा जाणवणे वगैरे तक्रारींवर चणे उपयोगी असतात. नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठी चणे धातुपुष्टीस उत्तम होत. चण्याबरोबर गुळाची योजना केलेली असते कारण गुळातील उष्णता चणे पचवण्यास मदत करते. गुळाचा खडा तोंडात ठेवला रे ठेवला की त्यातून लगेच शरीराला शक्ती मिळते म्हणून उन्हातान्हातून आल्यावर गूळ-पाणी देण्याची पद्धत असते. गूळ हा रक्त वर्धकही असतो. अशा प्रकारे हनुमानजयंतीला दिला जाणारा चणे-गुळाचा प्रसादही आरोग्याच्या दृष्टीनेच योजलेला आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..