आज व्हॉट्स अँप वर माझा पहिला ग्रुप चालू करून व व्हॉट्स अँपवर लिखाणास सुरुवात करून सहा वर्षे झाली. मी १४ जून २०१५ रोजी ‘मराठी पदार्थ’ या नावाने पहिला समूह चालू केला. या समुहाचा उद्देश आपल्या कडील असलेल्या खाद्य पदार्थाची माहिती व त्यांची साहित्य- कृती एकमेकांना मिळावी हा उद्देश होता. व्हॉट्स अँपवर माझ्या कडील माहिती टाकण्यास सुरुवात केली. या समूहाला भरघोस प्रतिसाद मिळाला.
या सोबतच काही काळानी मी आरोग्याच्या विषयी व संगीत व चित्रपट या विषयी समूह चालू केले. संगीत व चित्रपट या विषयी लिखाण करत असताना एक कल्पना सुचली आपण रोज कॅलेंडर नुसार त्या त्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी, जन्मदिनी, स्मृतिदिनी त्यांची माहिती टाकावी, या कल्पनेला खूपच प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाने अनेक कलाकारांनी खूप छान प्रतिसाद दिला. अनेक मोठ्या कलाकारांची / व्यक्तीची, लोककलाकारांची, पत्रकारांची ओळख झाली. तसेच अनेक व्हॉट्स अँप वरील अनेक तरुण, ज्येष्ठ सभासदांची मैत्री झाली. या समूहात लिखाण करत असताना अनेक समूहाच्या अँडमीन नी मला त्यांच्या समूहावर सामील करून घेतले. मध्यंतरीच्या काळात तर जवळजवळ मी १०० पेक्षा अधिक समूहांचा अँडमीन होतो व मी १०० हून अधिक ग्रुपवर माहिती टाकत होतो. (तेव्हा एका वेळी अनेक ग्रुपवर पोस्ट टाकता येत होती.)
पण काही काळानी ही सोय व्हॉट्स अँपने बंद केली आता एका वेळी फक्त ५ ग्रुपवर पोस्ट टाकता येते. त्यामुळे मी अनेक समूहावर पोस्ट टाकणे कमी केले. सध्या मी ठराविक ग्रुपवर पोस्ट टाकत असतो.
सध्या माझे पदार्थ विषयी ५ समूह असून काही कारणाने मला हल्ली पदार्थ विषयी समूहावर माहिती टाकणे जमत नाही तरी त्या सभासदांना क्षमस्व. लवकरच पदार्थ विषयी समूहावर या समुहावर माहिती टाकण्यास सुरुवात करीन.
‘आरोग्य’ विषयी या समुहावर माहिती टाकणे बंद केले याला कारण मी डॉक्टर नाही असे मला रोज दहा जणांना फोनवर सांगावे लागत असे.
व्हॉट्स अँप मधील लेखाच्या विषयी ‘थिंक महाराष्ट्र’,‘सकाळ टाईम्स’, ‘चित्रलेखा’ व नवाकाळ व इतर वृत्तपत्रात माझी मुलाखत छापून आली. गेले सहा वर्ष करत असलेले माझे लिखाण मराठी सृष्टी व बाईट् ऑफ इंडिया या वेब साईट उपलब्ध आहे.
या सोबतच माझ्या सर्व विषयाच्या पोस्ट (अभिनेते,अभिनेत्री,गायक,गायिका,संगीतकार, राजकारणी, राजकारण, समाजकारण, कलाकार, खेळाडू, ताज्या घडामोडी, संगीत, चित्रपट, गुगल डुडल, वर्षातील सर्व जागतिक दिन ) फेसबुकवर असतात. फेसबुकवर माझे ‘पदार्थाविषयी बोलू’ या नावाने पेज पण आहे. माझ्या एका ‘कानसेन’या संगीताच्या समुहाचे आम्ही दर वर्षी स्नेहसंमेलन भरवत असतो, सोशल मीडियाद्वारे राज्यभरातील विविध प्रांतातून एकत्र आलेल्या ‘कानसेनां’नी सलग चार वर्षे रत्नागिरी येथे कानसेनचे लाइव्ह स्नेहसंमेलन साजरे केले. मात्र यावर्षी करोना मुळे सोशल मीडियाद्वारे संमेलन यशस्वीपणे साजरे झाले. संमेलनाला यंदा व्यापक स्वरूप मिळाले. सलग दहा दिवस वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी मिळाली. फेसबूकच्या माध्यमातून पार पडलेल्या या संमेलनात पाचशेहून अधिक जणांनी उपस्थिती नोंदवली. दररोज तासभराचा लाइव्ह परफॉर्मन्सही रंगला.
लॉकडाऊन च्या काळात मी खूप माहिती जमवली असून अंदाजे माझ्याकडे दहा हजार व्यक्तीची माहिती/लेख व ५०० हून अधिक पदार्थाविषयी लेख माझ्या संग्रही आहेत.
मी सातत्याने गेली सहा वर्षे व्हॉट्स अॅप वर त्या त्या समुहावर त्या त्या विषयाने माहिती टाकत असून गेल्या सहा वर्षापैकी एखाद दुसरा दिवस सोडून मी सकाळी समुहावर माहिती टाकली नाही असे झाले नाही.
या सहा वर्षात मला माझ्या कुटुंबाची छान साथ मिळाली तसेच आपल्या सर्वांचे सहकार्य कायम मला मिळाले व पुढे असेच सहकार्य मिळत राहील अशी आशा…!!
माझे लिखाण उपलब्ध असलेल्या वेब साईट.
मराठी सृष्टी.
https://www.marathisrushti.com/articles/author/sanvelankar/
बाईट् ऑफ इंडिया.
https://www.bytesofindia.com/main/Sanjeev%20Vasant%20Velankar?s=1
फेसबुक
https://www.facebook.com/sanvelankar/
फेसबुक पदार्थाविषयी बोलू
https://www.facebook.com/groups/128014387707133
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply