रेल्वे गर्दीने भरून गेली होती. टी. सी ला एक पाकीट सापडते. त्यात काहीच पुरावा नसल्याने काहीच अंदाज येईना शेवटी त्याने विचारले, ही पर्स कुणाची आहे ?,तेव्हा एक आजोबा येतात आणि म्हणतात माझी आहे. टी.सी म्हणतो,खात्री कशी पटणार ? आजोबा म्हणतात त्यात श्रीकृष्णाचा फोटो आहे . त्यावर टी सी म्हणतो असा फोटो कोणाकडेही पडेल.त्यात काय विशेष ? तुमचा फोटोही नाही त्यावर आजोबा शांतपणे उत्तर देतात ,मी शाळेत असताना ही पर्स मला वडिलांनी दिली होती .थोडे पैसे खाऊसाठी दिलेले असायचे.तेव्हा आई बाबांचा फोटो लावला होता जसा कॉलेज कुमार झालो तेव्हा माझा मला फोटो आवडायचा त्यांचा फोटो काढून मग माझा फोटो ठेवायला लागलो नंतर लग्न झाल माझी बायको सुंदर होती माझा फोटो काढून मग तिचा फोटो ठेवू लागलो ,काही वर्षांनी आम्हाला एक मुल झाले . आयुष्याचा नवीन पर्व सुरु झाल . मग त्याचा फोटो ठेवू लागलो .
मात्र हे सगळ सांगताना आजोबांचे डोळे पाणावले गेले , ते बोलतच राहिले, म्हणले काही वर्षापूर्वी माझे आई बाबा गेले नंतर माझी पत्नीही साथ सोडून गेली ,ज्या मुलाला मी वाढवलं त्यानेही मला सोडलं तो आता त्याच्या आयुष्यात व्यस्त झाला , मला पाहायला त्याच्याकडे वेळ हि नाही . म्हणून आता माझ्या पर्स मध्ये मी श्रीकृष्णाचा फोटो लावलाय . मला कळून चुकलय की भगवान श्रीकृष्ण माझे शाश्वत साथी आहेत . माझी साथ कधीच सोडणार नाही, जर मला आधीच कळलं असत की जे प्रेम मी माझ्या कुटुंबावर केले तेच मी देवावर केले असते तर असे एकटे पडलो नसतो .
टी. सी ने त्या आजोबांची व्यथा समजून घेतली आणि पर्स परत केली . तो टी सी पुढच्या स्टेशन ला उतरून एका पेपर विक्रेत्याकडे जाऊन विचारले “भगवान श्रीकृष्णाचा फोटो आहे का ? मला माझ्या पर्स मध्ये ठेवायचा आहे………
गोष्ट व्यावहारिक दृष्टीने touching असली तरी येत्या काळाची चुणुक दाखवणारी आहे. कुटूंब छोटी छोटी होत चालली आहेत, स्वयंकेंद्रित होत चालली आहेत. आपण स्वत: पुढच्या अशा परिस्थिती साठी तयार असले पाहिजे म्हणजे नैराश्य येणार नाही. ह्या सगळ्यावर उपाय म्हणजे ‘योग’ आणि ‘ध्यान’ यांची कास आपण धरली पाहिजे.
जय श्रीकृष्णा !!
Leave a Reply