एकाद्या परक्या देशात जर आजारी पडलात तर त्यांच्याच भाषेत बोला. नाहीतर अर्थाचा अनर्थ व्हायचा !!
अमेरिकेत एका भारतीयाला रस्त्यातच असतांना हृदयविकाराचा झटका आला. कोणीतरी त्याला अँब्युलन्समध्ये उचलून घेतले. तो भाविक गृहस्थ देवाची प्रार्थना करण्यासाठी सतत त्याच्या नावाचा जप करत होता.
“हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् …..”
त्याला घेऊन अँब्युलन्स त्याच्या घरी गेली.
त्याच्या पत्नीने विचारले, “याला तुम्ही थेट हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेला नाहीत?”
समोरुन उत्तर आले, “काय करणार? त्याने हट्टच धरला होता हरी होम, हरी होम, हरी होम, हरी होम, हरी होम… ” (लवकर घरी न्या, लवकर घरी न्या, लवकर घरी न्या, )
तेव्हा सावध असा !!!!
Leave a Reply