हरकूळ बॅक वॉटर्स ….
फोंडा … भिरवंडे …. सांगवे …. कनेडी परिसर …
सह्याद्रीचा पायथा (राधानगरी घाट) …. तळकोकण
आयुष्याच्या सायंकाळी सूर मनांतच सनईचे
दूर दिगंती मृदू रंगांचे मनमोहन घन मलईचे
कोण वागलें काय वाउगें त्याचा आतां विसर पडे
भलें पुटा जें आलें त्याचे सडेच मागें आणि पुढें
स्नेह पांगले त्या घाटांतिल उंबरठयावर गोड उषा
पाणवठयावर दिवे वाहती दिवंगतांच्या गाढ निशा
गळला मोहर, तरीही वाटे पानफुटींतच नवलाई
सावळींत किलबिलती त्यांची जिवास बिलगे जवळाई
बघतों तेथें नटते माझी षोडश-पूजा अधिराणी
अर्घ्य दुजें कां? उतरे नयनीं सकलहि सरितांतिल पाणी …..
– कविवर्य बा. भ. बोरकर
— प्रकाश पिटकर
Image © Prakash Pitkar….
Leave a Reply