हर्ष उल्हासाने मन नाचले, मन भिंगरी होऊन फिरले,
पुत्रजन्माने अंत:करण किती, हर्षभरीत होऊन गेले,–!!!
इवले इवले हात पाय,
अन् टपोरे बाळाचे डोळे,
रंग गोरापान आणि वरती,
केसही काळे कुरळे,–!!!
छोट्या जिवांस पाहून,
मात्र मन हरखून गेले,
किती नवससायास,
केवढी व्रतवैकल्ये,
जो सांगेल तो उपाय ,
जीव टाकुनी सारे केले ,–!!!
हे कोणत्या जन्मीचे,
पुण्य माझे फळां आले,
अखेर ईश्वराने हाक ऐकुनी, चिमुकलेओटीत घातले,-!
कुलदीपक घराण्याचे,
नाव आता वाढवेल,
मरते समयी पाणी
आपल्या हातें घालेल,
आगमने त्याच्या, घर ,
उजळून उजळून गेले,–!!!!
पोटा पोरं नाही म्हणुनी,
लोक टोचून बोलती,
वांझ वांझ असा, जाता-येता सूर काढती,–!!!
एक आई म्हणून मी,
दाखवून की दिधले,
ऐका जनहो सारे,
आज मी आई जहाले,–!!!
हिमगौरी कर्वे.
©
Leave a Reply