ताणतणावाच्या विरुद्ध क्रिया म्हणजे हास्य!
हास्य ही परमेश्वराने मानवाला दिलेली सर्वांग सुंदर देणगी ! सुंदर हास्य हे मानवाशिवाय त्याने कोणालाच दिलेलं नाही.
माकडचाळे केल्यावर माकड हसतं असे म्हणतात पण ते म्हणजे दात विचकण, त्याला सुंदर हास्य म्हणता येणार नाही.
कोणत्याही अपेक्षेशिवाय तुमच्या स्वास्थासाठी मिळालेल्या या देणगीचा मानवाला कैकवेळा विसर पडतो आणि कधी उगाचच ताणतणावाच्या गर्तेत खोल खोल जातो.
साध्या साध्या गोष्टींकडे मार्मिक नजरेने पाहा. हास्य आपोआप फुलून येतं. आयुष्यात पूर्वी कधी घडलेले गमतीदार प्रसंग आठवून पाहा. आठवणीने सुद्धा हसायला येतं.
तेव्हा ताणतणावांच्या विचारांना दूर सारून हास्याला उजाळा द्या !
Leave a Reply