हत्तीदादा ??????
हत्ती दादा
हत्ती दादा
सदा तुम्ही
गवत खाता……१
चार चार
तुमचे पाय
खांबासारखे
जाड जुड……२
सोंड मजेदार
पिचकारीचा मान
आंघोळ घाली
तुम्हा छान छान…..३
कान बघा कसे
भले मोठे पान
सुपासारखे हालती
दाण दाण दाण……४
इवलेसे शेपुट
त्याची गंमत फार
उडवता उडेना
माश्या दोन चार…..५
इवलेसे डोळे
बघता तरी कसे
सर्कशीतले खेळ
करता तरी कसे….६
गणपती बाप्पा
तुमचा का भाऊ
तोही खातो बघा
सारखा-सारखा खाऊ..७
येतोस कारे
माझ्या घरी
गवताचा भारा
देईन दारी…..८
तुझी माझी मैत्री
आहे फार जुनी
शाळेतल्या अभ्यासात
म्हणायचो गाणी….९
कुरणातला मेवा
ठेवला राखून
दोस्तीचा मेवा
खा चाखून चाखून…१०
— सौ. माणिक शुरजोशी
Leave a Reply