|| हरी ॐ ||
हौसेला मोल आणि पैश्याला
किंमत नाही !
आजकाल समाजात
मोठेपणा, मान-सन्मान, प्रतिष्ठा व गौरव ह्यांच्या व्याख्या व परिभाषा माणसागणिक
बदलताना दिसतात. अभ्रष्ट, विनम्र, सुशील, सत्य, प्रेम व आनंदाच्या देवयान पंथावर
चालणारी माणसे बावळट, साधी, बुरसटलेल्या आणि जुन्या विचारांची समजण्यात येतात. पण
काही व्यक्तींना समाजात वरचे स्थान कधी
मिळते, तर ती किती श्रीमंत आहे? मोटारी, त्यात विलायती किती आहेत? मुंबईत जागा किती
आहेत? थंड हवेच्या ठिकाणी फार्महाउस किती आहेत? मोठमोठया क्लबचा मेंबर आहे का? मग
तो माणूस मोठा, तथाकथित
शहाणा, उच्चभ्रू समाजाचा प्रतिनिधी आणि प्रतिष्ठेचा !
दोन आठवडया पूर्वी काही वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी एक
ब्रेकिंगन्यूज दिली होती की लग्नात करोडो
रुपयाची उधळण करण्यात आली ! हौसेला मोल आणि पैशाला किंमत नाही म्हणतात ते हेच, आता
बघाना, लग्नात पत्रिकांवर खर्च किती तर कोटी रुपये, आपल्या सारखे लग्नासाठी हॉल
वगैरे नाही तर स्टेडीयम आणि तेही चक्क एका आठवडयासाठी, डेकोरेशन व इलेक्ट्रिकचा
वारेमाप वापर (बिचाऱ्या शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी वीज मिळत नाही.
गावागावात सगळीकडे भारनियमनामुळे वीज नाही) पण अश्या लग्न व इतर समारंभासाठी विज
वारेमाप खर्च होते याकडे शासनाचे लक्ष नाही. लग्नात खायचे पदार्थ तरी किती तर
शंभरावर प्रकारचे. बहुदा मुला/मुलीला आहेर दिला जातो पण येथे तर लग्नात आलेल्या
सर्वांना चांदीचे नाणे आणि ते कमी म्हणून एकवीस हजार रुपये बोला आता तर कळसच झाला.
लग्नाचा खर्च दोन्ही पार्टी विभागून करतात म्हणजे दोन्ही पार्टी त्याच तोलामोलाचे असणार
हे कुणीही सांगायला नको. अश्या समारंभांवर उधलेल्या पैश्यांना प्राप्तीकर
विभागाकडून विचारणा होते का?
कुठलाही सोहळा मग तो लग्न असो की आणि काही, साजरा करतांना
सगळ्याच गोष्टींचे भान ठेवले पाहिजे. माझ्याकडे चिक्कार पैसा आहे म्हणजे मी तो
कसाही खर्च करीन असे शक्यतो होऊ नये. शेवटी ज्याची त्याची विचारसरणी आहे. कोणावर कुठलीही
गोष्ट लादू नयेत या विचारसरणीचा मी आहे. परंतू जी व्यक्ती कष्टाने पैसा कमावते,
पैश्याची किंमत काय आहे ते जाणते, ती असा अमर्याद खर्च करणार नाही असे वाटते. पैसा
कुठे, कधी, केव्हा व कोणावर खर्च करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तीक प्रश्न आहे.
सध्याचे दिवस खूप कठीण आहेत. काही जणांना एकवेळचे सुद्धा
अन्न मिळणे कठीण आहे. मराठीत एक म्हण आहे “जोवरी पैसा तोवरी बैईसा” पैसा व सत्ता/पद/खुर्ची
गेली/संपली की कोणीही विचारत नाही, आपली आपली म्हणणारी माणसे ओळख दाखवत नाहीत आणि
दुखल/खुपल सुद्धा विचारीत नाहीत. बायको, मुलगा, मुलगी, सून कोणी कोणीही नाही. पैसे
दिलेत तर सर्व खुश. अश्या वेळेस परमेश्वर आठवतो.
जगदीश पटवर्धन
वझिरा, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply