नवीन लेखन...

कचरा : मोबाईल आणि संगणकाचा !

Hazards of Mobile e-Waste

संगणकाचा जमाना जुना होऊन आता मोबाईलचा जमाना आलाय. सहाजिकच आहे. हातात आणि खिशात मावणार्‍या मोबाईलवरुन संगणकाची सगळी कामं होऊ लागली तर संगणक हवाय कशाला?

बरं पुन्हा आपली क्रयशक्ती म्हणजेच खर्च करण्याची कुवत वाढल्यामुळे भारतीयांमध्येही आता “वापरा आणि फेकून द्या” ही वृत्ती रुजायला लागलेय.
दर महिन्याला मोबाईलच्या नवनव्या मॉडेलच्या जाहिरातींनी वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरलेले असतात. “ए” पासुन “झेड” पर्यंत सगळी अक्षरं आणि अक्षरांचे समूह वापरु या मॉडेल्सची बारशी केलेली असतात. या मॉडेल्सच्या जाहिरातीही इतक्या आकर्षक असतात की कॉलेज तरुण, गृहिणी वगैरेच काय.. तर अगदी व्यावसायिकही त्यांना भूलतात. दर चार-सहा महिन्यांनी मोबाईल बदलण्याची स्पर्धाच लागते. ऑनलाईन विक्री करणार्‍या संकेतस्थळांवर वेगवेगळ्या ऑफर्सही असतात.
नवा मोबाईल म्हटलं की नवा ‘लुक’, नव्या सुविधा.. सगळं काही नवं कोरं! तो आला की जुना मोबाईल कुठेतरी कोपर्‍यात पडतो. पूर्वी निदान “बाय-बॅक”ची सोय तरी होती. आता तर “बाय-बॅक” मध्ये जास्त पैसे मिळत नाहीत म्हणून जुना मोबाईल तसाच ठेवला जातो. कधीतरी लहान भाऊ-बहिणीला, तर कधी म्हातार्‍या आजोबांना दिला जातो. मात्र बर्‍याचदा तसाच कोण्यातरी कपाटात किंवा ड्रॉवरमध्ये पडून रहातो.  कधीतरी घरातला कचरा साफ करताना तो डोळ्यासमोर येतो आणि त्याची रवानगी होते थेट कचर्‍याच्या डब्यात.
एवढासा तर तो मोबाईल, त्याचा असा किती कचरा होणार? पण विचार करा, ज्या गतीने दुकानांमध्ये मोबाईल विकत घेतले जातात त्या गतीने एकट्या मुंबईत दिवसाला एक हजार मोबाईल कचर्‍यात जात असतील तर… वर्षाला किती झाले?
खरोखर आता वापरात नसलेल्या मोबाईलची संख्या म्हणजेच पर्यायाने मोबाईलचा कचरा इतका वाढलाय की ती एक मोठी समस्या बनली आहे. नुसता मोबाईलच नाही, तर जुने कॉम्युटर, जुने टीव्ही, डीव्हीडी प्लेअर, लॅपटॉप.अशा अनेक वस्तू मोठ्या प्रमाणात फेकून दिल्या जाताहेत आणि त्यांचा कचरा वाढत चाललाय.
या कचर्‍याच्या ढिगांचं करायचं काय हा प्रश्न महापालिकांना पडायला लागलाय. बरं आपल्याकडे इ-वेस्टला हाताळणारी सक्षम यंत्रणा उभी राहिली नसल्याने या सगळ्या वस्तू कचराकुंडीत टाकल्या जातात आणि तिथूनच त्यांचा प्रवास डंपिंग ग्राऊंडच्या दिशेने होतो आणि मग देवनारच्या डंपिंग ग्राऊंडला आग लागण्यासारख्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं.
या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीचा वेग प्रचंड आहे आणि तेवढाच त्यांना कचर्‍यात टाकण्याचाही वेग आहे. या वस्तूंची विल्हेवाट लावणं हे एक अतिशय कठीण काम आहें. साहजिकच विल्हेवाट न लागल्याने कचरा बनून त्या तशाच पडून राहत आहेत.
एका कम्प्युटरचे उदाहरण घेतले तर त्याच्या प्रत्येक भागात काही ना काही विषारी तसेच घातक पदार्थ असतात. मॉनिटर, की-बोर्ड, मदरबोर्ड, सीपीयु, टोनर, सीडी, केबल या सर्वच भागांमध्ये बेरिलियम, कॅमियम, क्रोमियम, शिसे यासारखा कोणता ना कोणता घातक धातू असतोच. याशिवाय अनेक भाग प्लॅस्टिकचे असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने वाईटच आहेत. त्यामुळें तें जाळता येत नाहीत आणि कुठं साठवताही येत नाहीत. त्यांचे विघटन करणें हें खर्चिक काम आहें.
जगात दररोज हजारो टन असा ‘ई-कचरा’ निर्माण होतो व तसाच पडून राहतो. त्यामुळेच त्याचे करायचे तरी अशी मोठी समस्या जगभर ऊभी राहिली आहे. भारतात एका अंदाजानुसार दरवर्षी
सुमारें दहा लाख टन कचरा निर्माण होतो त्यात महाराष्ट्राचा आणि मुंबईचा जवळपास दहा टक्के वाटा आहे. आयटी क्षेत्राचा सतत होत जाणारा विकास, नवनवी उपकरणे, चिनी बनावटीचे स्वस्त मोबाईल या सगळ्यामुळे भविष्यातही हा इ-कचरा आणखी वाढणार आहे.
हे असेच सुरू राहिले तर लवकरच संपूर्ण पृथ्वीभर या इ-कचर्‍याचे राज्य असेल. हे टाळायला तर हवंच.
यासाठी इ-कचर्‍याचं व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रभावी यंत्रणा तयार होणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.
— निनाद अरविंद प्रधान

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..