मानव योनी हीच महान नको करु हा वृथा अभिमान
मानुनी प्राण्यांत श्रेष्ठ झालास तूं अतिगर्विष्ठ
‘विवेकशक्ति’ असे ज्ञान हेच ठरविसी परिमाण
हाच निर्णय चुकीचा पाया ठरे गैरसमजाचा
उंच आकाशांतून घार पाही भक्ष्य जमिनीवर
तुजला नसे तिक्ष्ण दृष्टी निसर्गे दिली ती पक्षिसृष्टी
तंतुसी काढूनी मुखातूनी सुंदर विणी जाळे त्यांतूनी
कोळी विणतो सुंदर जाळे वास्तूकला ती कुणा न कळे
श्वास घेऊनी वस्तू शोधतो मानवाला चकीत करतो
श्वानाचा तूं घेसी उपयोग हाच तुझा पराजयाचा भाग
स्पर्शूनी आवाजांच्या लहरी नागराज चपळाई करी
स्पर्शेंद्रियाचे हे गुढ ज्ञान मानसा न होई अकलन
पक्षी सुंदर घरटी करती कौशल्याचे नमुने असती
कोठून मिळे त्यांना शिक्षण विचार करुन तूं हे जाण
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply