(मुक्तछंदात्मक)
थोडा वाकून पहा खाली,
काय चाललंय या पृथ्वीतली,
सत्ता, लत्ता, अधिकार, पैसा, यामधून एवढा माततो का कुणी,-? जनावरे बरी म्हणायची पाळी, संकेत, भाषा, सभ्यता, निष्ठा,
कशी पाळतात ती सारी,–!!!
समूहनियम, कर्तव्येही माहित,
अधिकाराचे बडगे दाखवत नाहीत,
नुसतीच माणुसकीचा आंव आणून,—-
पैसा इतका प्रिय असावा की, म्हाताऱ्या आई-बापांनी जावे वृद्धाश्रमी,
खस्ता जराही आठवत नाहीत, त्यांनी भोगलेल्या; केवळ लेकरांसाठी,–!!!
स्त्रीचे स्त्रीत्व शालीनतेत,
कुठे उडली रे लाज,–?
किती किती असभ्य बनल्या आहेत त्या, —
आज स्वतःच्या हाताने घेतलंय करून,—-
समाजातली स्त्री फक्त भोगवस्तू स्त्री शक्तीचा आदर सन्मान,ते, करतो तरी कोण,–?
वासनांनी बरबटलेले डोळे,
बाकी काय बोलतील,–?
नीती प्रीती भक्ती कशाशी खातात,–?
जन्म-मृत्यूही इतके स्वस्त इथे,जीवनच महागडं झालंय,
अशा दुनियेत जगवतोस, ही, आम्हाला दिलेली शिक्षा का मोठी,–?
— © हिमगौरी कर्वे.
Leave a Reply