नवीन लेखन...

श्रवणयंत्र

अनेकांना श्रवणाची ही संवेदना या ना त्या कारणाने गमवावी लागते तर काही जण जन्मतःच हा दोष घेऊन येतात. श्रवणदोष सुधारण्यासाठी जे साधन वापरले जाते त्याला श्रवण यंत्र म्हणतात. ध्वनी ही अशा प्रकारची एक ऊर्जा असते अ जी आपण ऐकू शकतो. जेव्हा हवेच्या हालचालीने एखादी गोष्ट मागे पुढे होते त्यावेळी ध्वनीची निर्मिती होते.

आपल्या कानाची रचना अशी असते की, बाहेरच्या भागातच ध्वनिलहरी पकडल्या जातात व त्या आंतरकर्णाच्या दिशेने जाणाऱ्या छिद्रातून आत शिरतात, तेथे शेवटी ड्रमसारखी त्वचा असते त्याला इयरड्रम म्हणतात, ध्वनिलहरी त्यावर आदळतात तेव्हा हा पडदा हलतो, त्यानंतर कवटीच्या आतील भागातील हॅमर, अॅनव्हिल व स्टॅपैस ही तीन प्रकारची हाडे पडद्याच्या हालचाली टिपून त्या कॉकलिया नावाच्या गोगलगायीच्या आकाराच्या भागाकडे पाठवतात, त्या भागात द्रायू व सिलिया नावाचे सूक्ष्म केस असतात.

ध्वनिलहरींमुळे कॉकलियातील द्रायू हा मागेपुढे हलतो, त्यामुळे सिलिया उद्दिपित होतात व स्पंदने ओळखून विद्युत संदेश मेंदूकडे पाठवतात त्यामुळे आपल्याला आवाजाची जाणीव होते, या सगळ्या प्रक्रियेत ध्वनी हा कानापासून मेंदूपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाले तर कमी ऐकू येते, त्यात काही प्रमाणात सुधारणा करण्यासाठी श्रवणयंत्र बापरता येते. कानाचा पडदा फाटला किंवा कॉकलियातील केस कमी झाले असतील तर श्रवणदोष येतात.

श्रवणदोष असलेल्या व्यक्तींच्या कानाजवळ जाऊन बोलले तर त्यांना काही प्रमाणात ऐकू येते याचा अर्थ ज्यामुळे ध्वनिलहरींची तीव्रता थोडी वाढवता येईल असे यंत्र त्यांच्या कानाला लावले की त्यांना काही प्रमाणात चांगले ऐकू येईल हे सरळ आहे. त्यातून श्रवणयंत्राची कल्पना पुढे आली. श्रवणयंत्रात इलेक्ट्रॉनिक साऊंड अॅम्प्लीफायर वापरलेला असतो. जेव्हा एखादी व्यक्ती मायक्रोफोनवर बोलते व नंतर तिचा आवाज लाऊडस्पीकरवर मोठा होतो व सर्वांना ऐकू जातो, तीच पद्धत श्रवणयंत्रात वापरली जाते.

यात मायक्रोफोन, अॅम्प्लीफायर व लाऊडस्पीकर हे एका छोट्या प्लास्टिक पॅकेजमध्ये बसवून ते कानाच्या मागे लावता येईल अशा पद्धतीने तयार करतात. यात बीटीई म्हणजे कानाच्या मागे बसवता येतील अशी व आयटीई म्हणजे कानात बसवता येतील अशी यंत्रे असतात. त्यातही अॅनलॉग श्रवणयंत्रात केवळ आवाजाची पातळी काहीशी वाढवली जाते. डिजिटल श्रवणयंत्रात आवाजाचे १ व ० वर आधारित सांकेतिक संदेशात रूपांतर केले जाते व नंतर पुन्हा त्याचे ध्वनित रूपांतर केले जाते. यात नको तो आवाज टाळता येतो, या यंत्रांचे प्रोग्रॅमिंगही करता येते, त्यामुळे ही यंत्रे खूपच महाग असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..