फिल्म इंडस्ट्रीमधील जेष्ठ कलाकार ‘कॅब्रे क्विन’ हेलन यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३९ रोजी बर्मा मध्ये झाला. आपल्याला जरी त्या फक्त ‘हेलन’ म्हणून माहीत असल्या तरी त्यांचे पूर्ण नाव हेलन जयराग रिचर्डसन आहे व त्या जन्माने अॅग्लो बर्मीज. ती बॉलिवुड मध्ये त्यांच्या अनेक विवीध भुमिकांमुळे व विशेष करून नृत्याविष्कारामुळे ‘हेलन’ या भरपूर गाजल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांच्या वडीलांचा मृत्यू झाल्याने १९४३ मध्ये हे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले. मुंबईत स्थायिक झाल्यावर हेलनच्या आई नर्स म्हणून काम करत असे पण मिळणार्या पगारात कुटुंब चालवणे कठिण झाल्याने त्यांच्या व स्वत:च्या चरितार्थासाठी हेलन यांनी शाळा सोडून देऊन नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरूवात केली. त्यांची एक कुटुंब स्नेही अभिनेत्री कुकू ही त्यावेळी बॉलिवूड मधली एक अग्रगण्य नर्तिका म्हणून ओळखली जायच्या, त्यांच्या ओळखीने हेलन यांना अतिशय लहान वयातच चित्रपटात कोरस डान्सर म्हणून काम मिळाले. हेलनचं अॅंग्लो व बर्मिस सौंदर्य हे चित्रपटातील मुख्य अभिनेत्री बनण्याच्या मार्गातला मोठा अडथळा ठरले. त्या काळी आयटम नंबरसाठी ओळखल्या जाणा-या हेलन यांनी हावडा ब्रिज या सिनेमापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
त्यांचे सौंदर्य, शार्प लुक्स आणि चमकणारे डोळे हे मुख्यत्वे करून चित्रपटातल्या ‘भारतीय नारी रोल’च्या विरूद्ध बऱ्याचदा ‘हायलायटींग’ म्हणून वापरले जायचे. त्यामुळे चंद्रशेखर ते अमिताभ बच्चन यांसारख्या ‘लिडींग’ हिरोंबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून काम करून सुद्धा हेलन यांना खरे नाव व प्रसिद्धी ही त्यांच्या अनेक ‘व्हॅम्प’ व ‘निगेटिव्ह’ रोल्सनीच दिली. हेलन या त्यांच्या काळात जबरदस्त प्रसिद्ध होत्या. रस्त्यावरून जाताना त्यांना कधीही उघड चेहऱ्याने बाहेर फिरता आले नाही. कायम काहीतरी मुखवटासदृश घालून वावरावे लागे. १९५८ च्या ‘मेरा नाम चिं चिं चू’ पासून ते १९७० च्या दशकातील ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ पर्यंत हेलन यांनी चित्रपटसृष्टीवर ‘कॅब्रे क्विन’ म्हणून अधिराज्य गाजवले. १९७० च्या दशकात नवीन प्रवेश झालेल्या नट्यांनी शरिरप्रदर्शनाची तयारी दाखवली तेव्हा हेलन यांची प्रसिद्धी बरीच खालावली व त्या आर्थिक अडचणीतही सापडल्या. त्या वेळी त्यांना साथ लाभली ती प्रसिद्ध लेखक सलिम खान यांची.
जावेद अख्तर यांच्या बरोबर लिहित असलेल्या २ चित्रपटात उदा. इमान धरम, डॉन यात त्यांनी हेलन यांना चांगली भूमिका देऊ केली. हेलनच्या गाजलेल्या सर्व गाण्यांच्या यशात गाणाऱ्या गायिकांचे ही महत्व तितकेच आहे. ‘मेरा नाम चिं चिं चू’ व इतर बरीच गाणी गीता दत्त यांनी, तर साठ च्या दशकात व सत्तर च्या दशकाच्या सुरवातीला आशा भोसले यांनी ही हेलनसाठी पार्श्वगायन केले. ‘तिसरी मंझिल’ चित्रपटातील ‘ओ हसिना जुल्फोवाली जानेजहाँ…’ हे गाणं ‘रॉक अॅलन्ड रोल’ या संगीत प्रकारावर आधारलेलं होतं आणि ते प्रचंड गाजलं. या व्यतिरिक्त ‘शोले’ चित्रपटातलं “मेहबूबा मेहबूबा…” ‘इन्तेकाम’ मधलं “आ जानेजा…पुढे त्या सलिम खान यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. सलिम खान हे आधीपासून विवाहीत होते. आजचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान हा त्यांचा मुलगा. आजच्या आघाडीच्या अभिनेत्र्या सुद्धा अजूनही तिची गाजलेली गाणी व त्यावरचे डान्स हे इंटरनॅशनल स्टेज शोज मध्ये सादर करतात.
हेलन यांच्या विग पासून ते हेवा वाटावा अश्या तिच्या वॉर्डरोबपर्यंत सर्व काही अत्यंत प्रभावी होतं आणि त्याचा प्रभाव आजही चित्रपटसृष्टीवर आणि तिच्या चाहत्यांवर आहे. भारत सरकारने हेलन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply