नवीन लेखन...

हेल्मेट

हेल्मेटचा वापर पूर्वीच्या काळापासून होत असला तरी आता त्यात बरेच बदल होत गेले आहेत. हेल्मेट म्हणजे शिरस्त्राण हे त्या अर्थाने लढाईत डोक्याचे संरक्षण व्हावे यासाठी वापरले जात असे. ख्रिस्तपूर्व ९०० या असिरियन काळात हेल्मेट वापरली जात होती असा उल्लेख आहे.

आता त्याचा वापर क्रीडापटू, खाणकामगार, सायकलपटू, मोटारसायकलस्वार करतात. सैनिकही हेल्मेट वापरतात ते केवलार या आघात शोषक धाग्यांचे बनवलेले असतात. विशेष करून मोटारसायकल चालवताना जर अपघात झाला तर हेल्मेटमुळे माणसाच्या डोक्याचे पर्यायाने मेंदूचे संरक्षण होते. रस्त्यावर मिळणाऱ्या कमी दर्जाच्या हेल्मेटमुळे असे संरक्षण होतेच असे नाही. हेल्मेट हा कुठल्याही अपघाती मृत्यूवरचा रामबाण उपाय नाही. फक्त त्यात प्राणहानी टाळण्याची शक्यता असते. एकतर त्यामुळे तुमच्या डोळ्यांचेही सुसाट वाऱ्यापासून, धुळीपासून रक्षण होते, त्वचेवर होणारा प्रदूषणाचा परिणाम टळतो, फ्लिटर असेल तर प्रदूषित हवेपासून संरक्षणही होते. हेल्मेटचे बाहेरचे आवरण हे अतिशय मजबूत असते त्यात फायबर किंवा ग्लास पॉलिकार्बोनेटसारखे थर्मोप्लास्टिक वापरलेले असते, ते कडक असले तरी आघाताच्या वेळी ते दाबले जाते व डोक्याला होणाऱ्या आघाताची तीव्रता कमी करते. तेवढ्याने भागत नाही त्यामुळे आत इम्पॅक्ट अॅबसॉबिंग लायनर असतो.

त्यात फोम म्हणजे स्टायमरोफोम म्हणजे पॉलिस्टरीनचा वापर केलेला असतो, यात धक्का आणखी शोषला जातो. जेव्हा मोठा आघात होतो तेव्हा बाहेरचे आवरण व लायनर दोन्ही दाबले जातात. यात तिसरा थर असतो तो कंफर्ट पॅडिंगचा. यात मऊ फोम किंवा कापडाचा वापर केलेला असतो. त्यामुळे हेल्मेट डोक्यावर व्यवस्थित बसते. रिटेन्शन सिस्टीम म्हणजे हेल्मेट स्थि राहावे यासाठी एक पट्टा असतो तो हनुवटीभोवती बांधल जातो.

त्यात एक खटका वापरलेला असतो. हेल्मेटमधून बाजूचे १०५ अंशातील दिसले पाहिजे. हेल्मेटला लावलेली काच सतत स्वच्छ व ओरखडे विरहित असावी, हेल्मेट रसायनांनी धुवू नये. कमी तीव्र साबणाच्या पाण्याने ते स्वच्छ करावे. हेल्मेट विकत घेताना ते तुमच्या मापाचे विकत घ्या. त्यावर उत्पादन दिनांक, उत्पादकाचे नाव आहे की नाही बघून घ्या. पूर्ण चेहरा झाकणारे व हाफ हेल्मेट अशा दोन प्रकारात ते मिळते. पूर्ण हेल्मेटने जास्त सुरक्षा मिळते. हेल्मेट वजनाने हलक्यात हलके असावे. जड हेल्मेटने मानेला त्रास होतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..