नवीन लेखन...

फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड

“मला सर्वांना वापरता येईल अशी मोटार बनवायची आहे.” ३० वर्षांचा फोर्ड सर्वांसमोर आपल्या नवीन तयार केलेल्या मोटारीचे डिझाईन पेश करत होता. त्यांचा जन्म ३० जुलै १८६३ रोजी झाला.

“हि फोर्ड मोटार दणकट, वजनाला हलकी फक्त १००० पौंड वजनाची आहे. ४ सिलिंडर इंजिनाची हि गाडी ताशी ४५ मैल वेगाने धावू शकते. सध्या हिची किंमत फक्त $९०० आहे. हिच्या बरोबरीच्या गाड्या साधारणपणे $१५०० ला विकल्या जातात. आणि यामुळेच हि गाडी सर्वांना परवडणारी जगातील पहिली गाडी असेल.” असे म्हणून त्याने सर्वांच्या पुढे आपल्या गाडीचे एक चित्र सरकवले. हेन्री फोर्डच्या उद्योगीपणाचा अनुभव त्याच्या घरच्यांना आणि मित्रांना त्याच्या लहानपणा पासूनच येऊ लागला होता. त्याच्या वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी त्याच्या वडिलांनी त्याला एक पॉकेट वॉच आणून दिले होते. त्यात तो रमला. इतका की तो पंधरा वर्षाचा होई पर्यंत त्याने आपले शेजारी आणि मित्र यांची घडय़ाळे शंभरदा उघडली आणि पुन्हा त्यांची जुळवणी केली. तो तेरा वर्षांचा असताना त्याचे मातृछत्र हरपले आणि तो जवळपास मानसिकरीत्या उध्वस्त झाला. त्याचे त्याच्या आईवर खूप प्रेम होते.

समजू लागले त्या वयापासूनच यंत्राशी त्यांची मैत्री झाली, या यंत्रांच्या ओढीनेच ‘अश्वहीन रथ’ म्हणजेच मोटरगाडी बनविण्याचे त्यांना पडलेले स्वप्न आणि त्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीच्या साथीने केलेले कठोर परिश्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत. घोडय़ाशिवाय कधी रथ चालतो काय, अशी चेष्टा लोक करीत. शेवटी अनेक दुरुस्त्या करीत १८९३ मध्ये त्याने आपली गाडी रस्त्यावर आणलीच. मात्र पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रसंग वारंवार येऊ लागले, या गाडीच्या आवाजाने घोडे उधळतात,गाई दूध देत नाहीत, कोंबडय़ा अंडी घालत नाहीत, रस्ते खराब होतात, अशा तक्रारी लोक करीत होते. आज हे वाचताना गंमत वाटते.अशा तक्रारी लोक करू लागले. शेवटी डेट्रॉइटच्या नगरपालांकडून हेन्री फोर्ड यांनी गाडी चालविण्याचा परवाना काढला.अमेरिकेतला हा पहिला परवाना होता.
हेन्री फोर्ड यांचे ७ एप्रिल १९४७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / विनोद शिवाजी गोरे

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..