नवीन लेखन...

हाय डेफिनेशन टीव्ही (एचडीटीव्ही)

हाय डेफिनेशन टेलिव्हिजन याचा अर्थ अतिशय सुस्पष्ट चित्र दाखवणारा टीव्ही असा आहे. पारंपरिक टीव्हीवरील चित्रापेक्षा यावरील प्रतिमा अधिक स्पष्ट असतात कारण त्यात प्रत्येक चित्रचौकटीत १० ते २० लाख रंगबिंदू म्हणजे पिक्सेल असतात.

हे प्रमाण नेहमीच्या टीव्हीपेक्षा पाच पटींनी जास्त असते पूर्वी एचडी टीव्हीचे प्रक्षेपण ॲनलॉग पद्धतीने होत असे आता ते डिजिटल पद्धतीने होते व त्यात व्हिडिओ कॉम्प्रेशनचे तत्त्व वापरलेले असते. १९६९ मध्ये जपानमध्ये एनएचके कंपनीने पहिल्यांदा ५:३ इतक्या प्रमाणातील पहिला हाय डेफिनेशन टीव्ही तयार केला.

त्यानंतर म्हणजे १९८१ च्या सुमारास अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांना म्युझ या एचडीटीव्हीवरील चित्रण दाखवण्यात आले, मग त्यांनी एचडी टीव्ही अमेरिकेत आणण्यात स्वारस्य दाखवले होते. एचडीटीव्हीला उच्च तरंगलांबीच्या सिग्नल्सची (नेहमीपेक्षा पाच पटींनी अधिक) आवश्यकता असते, त्यामुळे हा टीव्ही रोजच्या वापरात आणणे अवघड जात होते.

त्यामुळे १९७२ मध्ये अनेक सुधारणांचा विचार करूनही अॅनॅलॉग पद्धतीने हा टीव्ही व्यवहार्य ठरत नव्हता. त्यानंतर डिजिटल व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग संस्थेने या प्रक्षेपणात काही नवी मानके आणली. ५:३ हा मानक सुरुवातीला योग्य वाटत होता परंतु चित्रपट क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीशी स्पर्धा करण्यासाठी १६:९ हे सूत्र इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या गटाने मान्य केले.

एचडीटीव्ही तंत्रज्ञान अमेरिकेत १९९० मध्ये आले. २३ जुलै १९९६ रोजी पहिले प्रक्षेपण झाले. त्यानंतर १९९८ च्या सुमारास एचडीटीव्ही तंत्रज्ञानात बराच फरक झाला. २०१० मध्ये एचडीटीव्ही भारतात आला. सध्या कलर्स, स्टार प्लस, झीटीव्ही, सेटमॅक्स, झी स्पोर्ट्स, झी सिनेमा, डिस्कव्हरी, इएसपीएन, नॅशनल जिऑग्राफिक या वाहिन्या एचडी टीव्हीवर दिसतात.

राष्ट्रकुल स्पर्धांबरोबर दूरदर्शननेही एचडी प्रक्षेपण सुरू केले आहे. एचडीटीव्ही खूप महाग असल्याने त्याची प्रगती कमी वेगाने दिसत आहे. एचडीटीव्हीमध्ये आडवे व उभे रंगबिंदू यांचे प्रमाण जास्त असते. यात फ्रेम रेट व स्कॅनिंग सिस्टीम ही गुणवैशिष्ट्येही महत्त्वाची ठरतात. एचडीटीव्हीमध्ये चित्र अधिक सुस्पष्ट दिसते, त्याची स्पष्टता ३५ एमएमच्या फिल्मइतकी असते. त्यात चित्रातील रंग अधिक नैसर्गिक वाटतील असे असतात.

फ्रेम रेट सेकंदाला २५ ते ६० इतका असतो. फ्रेमरेट जेवढा जास्त तेवढे चित्र स्पष्ट असते. प्रोग्रेसिव्ह स्कॅनिंगमुळे यात चित्र स्थिर राहाते, त्यातील रंगबिंदू सारवल्यासारखे दिसत नाहीत. एचडीटीव्ही आयताकृती असल्याने त्यात चित्रपट पाहताना पूर्वीच्या टीव्हीप्रमाणे काही भाग कापला जात नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..