नवीन लेखन...

छत्रपती शिवरायांचे पुतळे जगात सर्वात जास्त

Highest Number of Statues of Chhatrapati Shivaji Maharaj

सर्व मराठी माणसांची आणि भारतीयांचीही मान उंचावेल अशी आश्चर्यचकीत करणारी एक बातमी नुकतीच वाचली. बातमीची सत्यासत्यतता तपासता येणं कठीण आहे. पण ही संख्या जर खरी असेल तर……

महापुरुषांचे पुतळे ही काही फक्त भारतीयांची मक्तेदारी नाही. जगातील अनेक शहरांमध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत. मात्र जगात सर्वात जास्त पुतळे कोणाचे असतील बरे?

जगात सर्वात जास्त पुतळे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे !

त्यांची देशनिहाय संख्या बघा..

अमेरिकेत – ४८
जपान – २९
चीन – ४०
श्रीलंका – ३५
रशिया -२३
थायलंड – २०

आता भारतात किती आहेत ते बघू.

महाराष्ट्र – २३००० पेक्षा जास्त
कर्नाटक – ११००० पेक्षा जास्त
उत्तर प्रदेश – ११०००
बिहार – ८०००
आंध्र प्रदेश – ७८००
राजस्थान – ५४००
मध्य प्रदेश – ६०००
गोवा – ४४००

एकूण – ८६००० पेक्षा जास्त

या विषयावर कोणीतरी सखोल अभ्यास केला तर Ph.D नक्की मिळवू शकेल.

 

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

12 Comments on छत्रपती शिवरायांचे पुतळे जगात सर्वात जास्त

  1. आपल्या भारतामध्ये पुतळे किती आहे यावर कमेंट केल्यापेक्षा आणखी किती वाढेल आणि त्यांची जय शिवाजी महाराजांनी कार्य केले आया बहिणीचा मान इत्यादी अनेक गोष्टी महाराजांमुळे आपल्याला कळले आणि ते आपल्या आई बहिणींना आपण कसं सांगणार याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे दादा असं मला वाटते राजे अजूनही प्रत्येकाच्या मनामनात आहे तू मला वाटते हे कमेंट नसून माझा विचार आहे काही चुकलं असल्यास माफ करा

  2. खरंच हे बातमी ऐकून छाती फुगून आली
    छत्रपती शिवाजी महाराज की जय ??

    • दादा तुम्ही सगळ्या ठिकाणी जाऊन फिरून आलात का तुम्हाला जर खरी माहिती माहित असेल असेल तर शेअर करा पण ज्या व्यक्तीने ही सगळी माहिती गोळा केली आहे त्यांनी कष्ट घेतले आहे त्या बातमीला खोटे म्हणण्याचा काहीही हक्क तुम्हाला नाही

    • आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

      लेखाच्या सुरुवातीलाच त्यातील माहितीची सत्यासत्यता तपासता येणे कठीण आहे असे म्हटलेले आहे. अशा गोष्टी फार सिरियसली घेण्यासारख्या नसतात.

      अर्थात आपल्याकडे सत्य आकडेवारी असल्यास तिचे स्वागतच आहे.

      धन्यवाद

    • हे खोट आहे तर मग तुम्ही सांगा
      छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे
      संपुर्ण जगात किती आहेत
      व फक्त आपल्या भारत देशात किती आहेत बरं

      आणि मला याचं उत्तर लवकर हवं आत्ताच???

      ??जय शिवराय??
      ??जय संभाजीराजे??

  3. प्रधान साहेब,
    Wow ! शिवरायांचे इतके पुतळे जगात आहेत ! वाचून आनंद वाटला, छाती अभिमानानें भरून आली.
    महापुरुषांचे दैवतीकरण करण्याची आपली संस्कृतीच आहे, उदा. राम, कृष्ण, बुद्ध वगैरे. तसेच , शिवाजी महाराजांचेंही. आता, शिवरायांच्या प्रचंड मोठ्या पुतळ्याची ( जगातील सर्वात उंच ? ) सुरुवात, भूमी पूजन वगैरे लवकरच होणार आहे. तो जरूर होवो, तोही आमच्या अभिमानाचा विषय ठरेल. मात्र, शिवरायांची नीती — राजनीती असो किंवा सामाजिक असो, प्रजेबद्दलची काळजी असो—- किती राजकारणी पाळतात, हा शोधाचा विषय व्हावा. घोषणांपेक्षा व पुतळ्यांपेक्षा, नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या एक हजारांश जरी कृती केली, तरी सर्वसासान्य जनतेला कृतार्थ वाटेल.
    स्नेहादरपूर्वक,
    सुभाष नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..