हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा यांचे खरे नाव आशुतोष नीखरा आहे. त्यांचा जन्म १० नोव्हेंबर १९६४ रोजी गाजरवाडा येथे झाला. त्यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले.
१९९४ मध्ये महेश भट्ट यांच्या ‘स्वाभिमान’ मालिकेतील ‘त्यागी’ या पहिल्याच भूमिकेतून सर्वांचे लक्ष वेधणारा अभिनेता आशुतोष राणा पुढे ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’सारख्या चित्रपटांतून दज्रेदार आणि प्रभावी खलनायकाच्या भूमिकेत दमदारपणे उभा राहिला. दुश्मन सिनेमातील दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.
आशुतोष राणा यांचे लग्न अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्याबरोबर झाले आहे.
आशुतोष राणा हे मोठ्या पडद्याबरोबरच छोट्या पडद्यावरही झळकले. स्वाभिमान, फर्ज, कभी कभी, वारिस या मालिकांमध्ये त्यांचे दर्शन घडले. रिअँलिटी शोच्या सूत्रसंचालनाची धुराही आशुतोष राणा यांनी सांभाळली होती. बॉलिवूडबरोबरच आशुतोषने दाक्षिणात्य सिनेमातही अभिनय केला आहे. उर्दू, इंग्रजी आणि तेलगु भाषेचे त्यांना ज्ञान आहे.
येडा या मराठी चित्रपटात आशुतोष राणा यांनी काम केले आहे.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ – इंटरनेट
Leave a Reply