नवीन लेखन...

मुन्शी प्रेमचंद

आज हिंदी व उर्दू साहित्यातील नावाजलेले लेखक मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म ३१ जुलै १८८० रोजी वाराणसी येथे झाला.

मुन्शी प्रेमचंद यांचे धनपत राय हे खरे नाव होते. साहित्य आणि कादंबरी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मुन्शी प्रेमचंद यांना ‘उपन्यास सम्राट’ म्हणूनही ओळखले जाते.

प्रेमचंदांनी १९१३ ते १९३१ पर्यंत एकूण २२४ कथा, १०० लेख आणि १८ कादंबर्या् लिहिल्या. त्यांची पहिली कादंबरी ‘असरारे महाबिद’ उर्दू भाषेत होती. ती उर्दू साप्ताहिक ‘आवाज-ए-ख़ल्क’मध्ये ८ ऑक्टोबर १९०३ पासून क्रमशः प्रसिद्ध झाली, तर त्यांची शेवटची कादंबरी ‘मंगलसूत्र’ अपुरी राहिली.

प्रेमचंद यांनी महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन आपली सरकारी नोकरी सोडली व पहिली कादंबरी हिंदुस्थानबवरील ब्रिटिश सत्तेच्या जुलमाची आणि भारतीयांच्या गुलामगिरीवर लिहिली. ती जेव्हा पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली, तेव्हा जप्त केली गेली. मात्र, देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक होण्यापासून प्रेमचंद वाचले. त्यानंतर त्यांनी आपले नबाब धनपतराय हे नाव बदलून प्रेमचंद घेतले. १९२१ पर्यंत मा.प्रेमचंद शिक्षण खात्यात डेप्युटी कलेक्टर म्हणून नोकरी करीत होते, मात्र त्यानंतर ते बनारसला परतले, आणि त्यांनी फक्त देशमुक्तीच्या संघर्षाकरिता आपली लेखणी चालवण्याचे ठरविले.

१९२३ मध्ये त्यांनी ‘सरस्वती प्रेस’ची स्थापना केली. प्रेसच्या खर्चासाठी कर्ज मिळविण्याच्या उद्देशाने प्रेमचंद मुंबईला आले व त्यांनी एक चित्रपटकथा लिहून दिली. चित्रपटात त्यांनी मजुराच्या बापाची भूमिकाही केली. मात्र वर्षभरात प्रेमचंद परत गेले. प्रेमचंद यांचे साहित्य अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरले आहे. साहित्य क्षेत्रातील प्रेमचंद यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे.

एक संवेदनशील लेखक, सुजाण नागरिक आणि एक कुशल वक्ता अशी ओळख असणाऱ्या मुन्शी प्रेमचंद यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण ३०० लघुकथा, कादंबऱ्या आणि अनमोल अशा साहित्याचा खजिना दिला आहे. संप्रदाय, भ्रष्टाचार, जमिनदारी, गरिबी अशा विषयांवर भाष्य करत मुन्शी प्रेमचंद यांनी आपले साहित्य रचले होते. अतिशय सोप्या – सरळ भाषेत लिखाण करणाऱ्या प्रेमचंद यांचे साहित्य नवोदित लेखकांसाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत ठरले आहे.

मुन्शी प्रेमचंद यांचे निधन ८ ऑक्टोबर १९३६ रोजी झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on मुन्शी प्रेमचंद

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..