नवीन लेखन...

हिंदी भाषा – इतिहास, भूगोल आणि अंकगणित

हिंदी भाषा दिनाचे निमित्त केलेल्या हिंदी भाषणाचा मराठी अनुवाद

‘सारे जहांसे अच्छा हिंदोस्ता हमारा “ हे महात्मा गांधींची प्रिय गीत होते , प्रार्थना सभेत ते सामुहिक रित्या गातही असत.अल्लामा इक्बाल या शायराने लिहिलेले, अखंड भारताचे गुणगान करणारे हे गीत. फाळणीनंतर हा शायर पाकीस्तानात स्थायिक झाला. पाकीस्तानचे गुणगान करणारी गीतेही रचली, पाकीस्तानचा राष्ट्रकवी (शायर- ए- आझम) बनला. तरी त्याच्या गीतातील शब्द शब्द आजही अविस्मरणिय आहेत. [मजहब नही सिखाता आपस मे वैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदोस्ता हमारा]

आज हा शायर हिंदुस्तानचा नागरिक असता तर सेक्युकरवादी लोकांनी ही कविता राष्टगीत म्हणून डोक्यावर घेतली असती. तेच लोक आम्ही ‘वंदे मातरम “ म्हणणार नाही असे म्हणण्याची हिंमत दाखवतात.

वंदे मातरम हे गीत म्हणत हजारो स्वातंत्रवीर हसत हसत फासावर चढले. केवळ त्या गीताची भाषा संस्कृतप्रचूर आहे म्हणून उर्दूप्रेमींनी त्याला विरोध केला . शेवटी पंचम जोर्जची स्तुती करणारे ‘जन गण मन’ हे राष्ट्रगान झाले, एकच वैशिष्ट ते बॅंडवर वाजवणे सोपे आहे !

जगातील कुठल्याच देशांत चारहून अधिक भाषा बोलल्या जात नाहीत. पण भारतात २२ घटनामान्य भाषा आहेत व २०८० बोलीभाषा आहेत (कोरकू, गोंडी इत्यादि). अगदी एकाच राज्यात दर ५० किलोमिटर भाषा बदलते , उच्चार बदलतात. जसे उत्तर प्रदेशात ब्रज,अवधी, बुंदेली इत्यादि, महाराष्ट्रांत कोकणी, मालवणी, अहिराणी इत्यादि.

परप्रातीयांच्या नजरेने नागपूर व नागपूरची हिंदी : हिंदीचे एक प्रसिध्द हास्यकवी “ काका हाथरसी’ यांना नागपूर मुक्कमी एक कविता सुचली “ धन्य हे नागपूर नगरी”

‘जो न देखे रवि, ते देखे कवि याचा उक्त्तिचा प्रत्यय आणून दिला. त्यांनी लिहून ठेवले आहे की;

• कॉटन मार्केंट – जेथे कापुस नाही तर संत्री विकतात.
• नाग नदी – ज्यात नाग नाही पण घाण पाणी वाहते.
• पिली नदी – ज्यातील साचलेल्या पाण्याचा रंग हिरवा झाला आहे.
• रेशिम बाग – जेथे कोणताच बगिचा नाही ,न रेशिम विकले जाते.

नागपूर अभियांत्रिकी संस्थानमध्ये भारतातील सर्व राज्यातील विद्यार्थी शिकतात. नागपुरात चोविस तास पाणी व वीज पाहून चकित झालेल्या एका बिहारी विद्यार्थ्याने हे आश्चर्य घरी पत्र लिहून कळवले, “ यहां कोनो तकलिफ नाही , चौविस घंटे पानी और बिजली”

विनोबा भावे आपल्या भूदान यात्रेच्या निमित्ताने नागपूरला आले व एका विशाल सभेत त्यानी शेवटचे भाषण दिले. त्यात ते म्हणाले नागपूरकरांचे मन विशाल आहे. ते यशस्वी शिवाजीचा पुतळा उभारतात तसेच युध्दात हारलेल्या राणी लक्ष्मीबाईचाही तेवढाच भव्य पुतळा उभारतात. नागपुरात चौकाचौकात गांधींपासून ते गल्लीतल्या नगरसेवकाचे पुतळे दिसतात.

नागपूरातील कोणतीही मराठी व्यक्ती घराच्या बाहेर पाऊल टाकल्या हिंदीमध्ये बोलचाल सुरू करते मग समोरची ब्यक्ती मराठी पानवाला, रिक्षावाला, भाजीवाला किंवा चहावाला का असेना. कारण त्याच्या रक्तातच हिंदी असते. त्याचेसाठी वर्षाचा प्रत्येक दिवसच राष्ट्रभाषा दिवस असतो.

याच्याविरुध्द परिस्थिती म्हणजे ७० ते ८० वर्ष नागपूरात वास्तव्य करणारे अमराठी. ते कधीही मराठी बोलण्याचा किंवा शिकण्याचा प्रयत्न करणार नाहीत, मराठी बातम्या ऐकणे तर दूरच. कारण नागपूरचे मराठी लोक त्यांच्याशी हिंदीतच बोलतात. भारताच्या कोणत्याही शहरात हे दृष्य तुम्हाला दिसणार नाही.

अस्सल नागपूरकर बंम्बईया हिंदी (वो गयेला है ,वो सोयेला है ) कधिच बोलणार नाही. त्याच्या विदर्भी मराठीत हिंदीचा लहजा असतो. ( तो झोपून राहिला आहे किंवा तो जेऊन राहिला आहे)

नागपूरकर व्यक्ती कोणत्या प्रकारची हिंदी बोलतो त्यावरून तो कोणत्या भागात राहतो याची कल्पना करता येते. उदाहरणार्थ आदरणीय, बंदनिय,श्रदेय, अंततोगत्वा असे शब्द ऐकले की तो रेशिमबाग विभागाचा असावा असे खुशाल समजावे.

नागपुरांतील अनेक वस्त्यांची नांवे हिंदी आहेत –तकिया, मोमिनपूरा, गिटटीखदान,सतरंजीपूरा इत्यादि.
नागपूरचे मराठी भाषिक ज्या हिंदी शब्दांचा सर्रास उपयोग करतात त्याचा मराठी प्रतिशब्द त्यांनाच चटकन सांगता येणार नाही, जसे सवारी, किराया, रसिद, गलती इत्यादि.

श्रेष्ठ साहित्यकार पु.ल. देशपांडे म्हणतात “ पुण्यामुंबईचे लोक भुताना जितके घाबरत नाहीत तेवढे हिंदीला धाबरतात.” पण नागपूचे मराठी लोक भांडणे सुध्दा हिंदीतूनच करतात.

आत्ता आत्तापर्यत नागपूरकर मराठी अबे तुबेच्या भाषेत बोलत असत मग समोरची व्यक्ती महापौर असो की विद्यापीठाचा कुलपती का असेना. व्यक्तीच्या प्रथम नांवानेच हांक मारित. पण आता जी हा शब्द जोडतात जसे अशोकजी, विलासजी इत्यादि. याविरुध्द पुण्यामुंबईचे लोक स्वत:च्या नावामागे श्रीमंत , सेठ अशी विशेषणे जोडतात, भले ती व्यक्ती हलवाई असो किंवा चहा टपरीचा मालक कां असेना.
नागपूरच्या मराठी भाषिकांसाठी हिंदी भाषा म्हणजे सर्वात सोपा विषय

हिंदी भाषेचा इतिहास : हिंदी भाषेचा उगम सातव्या शतकात संस्कृत भाषेतून झाला.स्वातंत्र मिळाल्या नंतर सेक्युलरवादी लोकांनी हिंदु या शब्दा ऐवजी हिंदी शब्द वापरणे सुरू केले . जसे हिंदु वास्तुशास्त्र हिंदी वास्तुशास्त्र झाले .

संस्कृत ही सर्व भारतीय भाषांची जननी : कांही दुराग्रही नेता हिंदुस्तानी (उर्दू बाहुल्य असलेली हिंदी) भाषेला राष्ट्रभाषा करावी या मताचे होते पण संस्कृत व हिंदी भाषाप्रेमी लोकांनी ते हाणून पाडले.

राजकारणी लोक संस्कृत ही एक मृत भाषा आहे असे सांगतात.पण हिब्रु सारख़्या मृत भाषेचे पुनुर्जीवन करून इस्राइल सारख्या देशने तीला राष्ट्रभाषा बनवली कारण जगभरातील जे यहुदी तेथे स्थापित झाले त्यांची हिब्रु ही आत्म सन्मानाची गोष्ट आहे.

१९४६ साली महात्मा गांधी म्हणाले होते ‘ स्वतंत्र भारतात मला जर एक दिवसाची सत्ता मिळाली तर मी सर्व प्रथम तीन कामे करीन,

• हिंदी ही भारताची राष्ट्र भाषा करेन,
• संपूर्ण भारतात दारुबंदी करेन,
• देशात गोहत्या प्रतिबंधक कायदा करेन.
• १९४६ साली हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा असावी असा प्रस्ताव कॉग्रेस पक्षाने संमत केला.
• १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताचे संविधान बनवणे ही सर्वात प्राथमिक काम ठरले.
• १९५० साली संविधान तयार झाले, पण राष्ट्रभाषा विषयावर सर्वसंमती बनली नाही. १९६५ पर्यंत इंग्रजी ही राज्यभाषा( कामकाजी) भाषा राहिल त्यानंतर हिंदी ही भारताची राष्ट्र भाषा असेल असे ठरले.
• १९६५च्या सुरवातीसच दक्षिण भारतातात हिंदीविरुध्द हिंसक दंगली सुरू झाल्या. तत्कालिन प्रधानमंत्री लाल बहादूर समितीने असा निर्णय घेतला की जो पर्यंत भारतातील सर्व राज्ये मान्य करत नाही तो पर्यत हिंदी ही राज्यभाषा राहिल. सर्व उच्च न्यायालये व उच्च न्यायलयाततील कामकाज इंग्रजी भाषेतून चालेल.
• संविधानाच्या अनुच्छेद ३५१ नूसार हिंदी भाषेचा प्रचार करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी व कर्तव्य असेल. १४ सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून (कसाबसा) पाळला जातो.
• हिंदी भाषा बहुल राज्ये, हिमाचलप्रदेश, हरियाणा, राजस्तान, मद्यप्रदेश व उत्तर प्रदेशात हिंदी ही अधिकृत भाषा असेल.
• २०१० साली गुजरात उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की “ हिंदी ही राष्ट्र भाषा नाही कारण घटनेत तसा उल्लेख नाही.

हिंदी भाषेची अधिकृत लिपी देवनागरी ( डावीकडून –उजवीकडे लिहिली जाणारी) आहे.या भाषेत ११ स्वर ३३ व्यंजने आहेत पण ळ हे व्यंजन नाही. त्यामुळे हिंदी भाषिक ळ ऐवजी ल असा चूकीचा उच्चार करतात. हे मराठी लोक सहन करतात. पण दक्षिणात्य लोक बंगलोर चा उच्चार बंगळुरू असाच व तामिलनाडु चा उच्चार तमिळनाडू असाच झाला पाहिजे असा आग्रह करतात. भारताबाहेर फिजी देशाची अधिकृत भाषा आहे अवधी –हिंदी

हिंदी भाषेचे घोर विरोधक इंग्रजी भाषेच्या समर्थनासाठी चार तर्क देतात ते असे,

१-इंग्रजी ही आंतरराष्ट्रिय भाषा आहे.
२-इंग्रजी शिवाय विज्ञान व तंत्रशिक्षण मिळवणे शक्य नाही
३-इंग्रजी शिवाय देशाची प्रगती होणे शक्य नाही.
४-इंग्रजी ही समृध्द भाषा आहे.

१ – इंग्रजी ही आंतरराष्ट्रिय भाषा आहे – हा तर्क खोटा आहे कारण,

• आज जगात २०० पेक्षा अधिक देश आहेत त्यांची लोकसंख्या अंदाजे ६५० कोटी आहे.
• केवळ दहा देश ज्यांची लोकसंख्या अंदाजे ३० कोटी आहे, अशा देशातच इंग्रजी लिहिली वाचली किंवा बोलली जाते. भारताबाहेर ८० कोटी लोक हिंदी बोलू किंवा वाचू शकतात.
• जगात फक्त १५ देशातच इंग्रजी वर्तमानपत्रे छापली व विकली जातात. लोकसंख्येच्या दृष्टीने चीनी भाषा पहिल्या, हिंदी दुस-या क्रमांकावर आहेत . ३ ते ११ क्रमांकावर रशियन स्पनिश, पोर्तुगाली, डच वगैरे भाषा आहेत. इंग्रजी भाषेचा क्रमांक बारावा आहे .
मग इंग्रजी भाषा आंतरराष्ट्रिय भाषा कशी ठरते ?

२ – इंग्रजी शिवाय विज्ञान व तंत्रशिक्षण मिळवणे शक्य नाही – हा तर्क खोटा आहे. चीन,रशिया, जपान, फ्रांस इस्राएल सारख्या देशात विज्ञान व तंत्रशिक्षण त्या त्या देशाच्या राष्ट्रभाषेतूनच दिले जाते.

३ – इंग्रजी भाषेच्या शिक्षणाशिवाय देशाची प्रगती होणे शक्य नाही- हा तर्क खोटा आहे. चीन,फ्रांस कोरिया सारखे देश जे कधी इंग्रजांचे गुलाम होते त्यांनी आपापल्या देशात इंग्रजीमुक्त शिक्षण सुरू केले ते इंग्लडच्यापेक्षा अधिकप्रगत व संपन्न देश झाले आहेत.

४ – इंग्रजी एक समृध्द भाषा आहे कां? त्रिवार नाही. कारण ज्या भाषेचे व्याकरण नियमबध्द असते व त्या भाषेत अमर्याद शब्द उपलब्ध असतात ती खरी समृध्द भाषा.
• इंग्रजी भाषेचा उगम पाचव्या शताब्दीमध्ये झाला .आरंभ कालात त्या भाषेत केवळ ६५००० शब्द होते ते वाढता वाढता २००९ साली २५० हजार शब्द झाले आहेत. ते सुध्दा इतर भाषातील शब्दांची उचलेगिरी करून.
• हिंदी भाषेचा उगम सातव्या शताब्दीमध्ये झाला. त्या भाषेत सात लाखांहून अधिक शब्द आहेत.
• संस्कृत भाषेचा उगम ख्रिस्तपूर्व २००० वर्षांपूर्वी झाला, त्या भाषेत ५ कोटी शब्द आहेत.
भविष्यात हिंदी भाषेचा प्रसार : हिंदी भाषेची सक्ती करून हिंदी भाषेचा प्रसार होणार नाही. मग ते शालेय शिक्षणात त्रिभाषेचे सूत्र असो किंवा हिंदी उतिर्ण करणा-यांना पगारवाढीचे प्रलोभन असो.

संदर्भ –ग्रंथ, लेख व अन्य प्रकार -दृक-श्राव्य- (ऑडिओ –व्हीडिओ)

• हिंदी देशाची राष्टभाषा नाही.
• इंग्रजी –एक मुर्खांची भाषा
• इंग्रजी भाषेचे यथार्थ दर्शन –राजिव दिक्षित
• अहमदाबाद उच्चा न्यायालयाचा निर्णय

— लेखक : प्रा. अशोक नेने
भ्रमणध्वनी -८३२९५०९५२२
सेवानिवृत्त प्राध्यापक , विश्वेश्वरय्या राष्टीय अभियांत्रिकी संस्थान , नागपूर

हिंदी भाषा – इतिहास, भूगोल आणि अंकगणित
हिंदी भाषा दिनाचे निमित्त केलेल्या हिंदी भाषणाचा मराठी अनुवाद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..