प्रसिद्ध गीतकार शंकरदास केसरीलाल उर्फ शैलेंद्र यांचा जन्म ३० ऑगस्ट १९२३ रोजी झाला. शंकरदास केसरीलाल हे शैलेंद्र यांचे मूळ नाव.
१९४७ साली एका कार्यक्रमात काव्यवाचनाचे त्याला निमंत्रण आले. तेथे त्याने ‘जलता है पंजाब’ ही कविता सादर केली. त्या कार्यक्रमाला राज कपूर उपस्थित होते. त्याने शैलेंद्र यांची कविता ऐकली आणि ते भारावले. त्याने शैलेंद्र यांना गाठले. तेव्हा राज कपूर ‘आग’ बनवत होता. ‘आग’साठी गीतलेखनाचा प्रस्ताव त्याने शैलेंद्र यांच्या समोर ठेवला; शैलेंद्र यांनी तो नाकारला.
नंतर पुलाखालून बरेच पाणी गेले. शैलेंद्रचे लग्न झाले होते. संसाराचा गाडा नीट हाकण्यासाठी पैशांची वानवा जाणवू लागली. एकेदिवशी त्याने सरळ आर.के स्टुडिओ गाठला. आरके कॅम्पमध्ये तेव्हा ‘बरसात’चे काम सुरू होते. राज कपूरने या अनोख्या शैलीच्या गीतकाराला ‘बरसात’च्या गीतलेखनाची संधी दिली. शैलेंद्रने ‘बरसात मे हमसे मिले तुम…’ आणि ‘पतली कमर है, तिरछी नजर है’ ही दोन गाणी लिहिली. तेव्हा पासून राज कपूर यांच्या सर्व चित्रपटात शैलेंद्र यांनी गाणी लिहिली.
शैलेंद्रच्या गाण्याने ‘आरके’ला एक नवी ओळख दिली. केवळ राज कपूरचा गीतकार ही ओळख पुसणारा म्हणून ‘गाइड’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘गाइड’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील माइलस्टोन. यात शैलेंद्र यांच्या गाण्यांचा वाटा निश्चितच सर्वात मोठा. ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’, ‘गाता रहे मेरा दिल’, ‘मोसे छल किये जा’, ‘वहाँ कौन है तेरा’ असे गानमोती या ‘गाइड’च्या माळेत शैलेंद्रने गुंफले आहेत. ‘काँटो से खीच के ए आँचल’ हा त्यातील मुकुटमणी ठरावा. १९५८ मध्ये ‘ये मेरा दीवानापन है…’ (फ़िल्म- यहूदी) च्या साठी १९५९ मध्ये ‘सब कुछ सीखा हमने…’ (फ़िल्म- अनाडी) १९६८ साली ‘मै गाऊं तुम सो जाओ…’ (फ़िल्म- ब्रह्मचारी)
सर्वश्रेष्ठ गीतकार म्हणून शैलेंद्र फ़िल्मफ़ेयर पुरस्कार मिळाला होता. आवारा हूँ, रमैया वस्ता वैया, दिल के झरोखे में तुझको बिठा कर,मुड मुड के ना देख मुड मुड के,पिया तोसे नैना लागे रे,दिल की नज़र से, अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहा खतम, अशी अनेक संस्मरणीय गाणी शैलेंद्र यांनी दिली.
गुलजार हे गीतकार बनण्यात शैलेंद्र यांचं मोठं योगदान होते. गुलजार साहेबांनीच म्हटल्या प्रमाणे, “शैलेंद्र चित्रपट सृष्टीने दिलेले सर्वात थोर गीतकार होते. शंकर जय किशन , सचिन देव बर्मन, देव आनंद , पंडित रविशंकर, बिमल रॉय यांच्या बरोबर त्यांनी अजरामर राहील इतकं अद्वितीय काम केलं आहे. “खूप कमी लोकानां माहित असेल की राज कपूर यांनी अभिनय केलेला ‘तीसरी कसम’ ‘हा चित्रपट या शैलेंद्र निर्मित होता. पण हा चित्रपट चालला नाही.
शैलेंद्र यांचे १४ डिसेंबर १९६६ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
शैलेंद्र यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=A6LEw97vXR4
https://www.youtube.com/watch?v=hu9tojGQ2BY
Leave a Reply