नवीन लेखन...

हिन्दी सृष्टीतील फाईट मास्टर- शेट्टी

हिंदी सिनेमा सृष्टीत अनेक फाईट मास्टर झाले पण त्यात सर्वात नावाजलेला होता शेट्टी. कारण तो फाईट मास्टर शिवाय अभिनेता सुद्धा होता.त्याचे नाव होते मुद्दू बाबू शेट्टी. तो मुळचा मंग्लोरचा.लहानपणी त्याचे अभ्यासात अजिबात लक्ष नव्हते. म्हणून त्याच्या  वडिलांना काळजी होती. त्यांनी त्याला मुंबईला पाठवले.त्यावेळी तो केवळ 9 वर्षाचा होता.मुंबईला आल्यावर काय करायचे हा प्रश्न होता. त्याला कॉटन ग्रीन येथे टाटाच्या canteen मध्ये वेटरची नोकरी मिळाली.जेवण व थोडे पैसे याची सोय झाली.प्रसिद्ध जिम्नॅस्टिक् के.एम.मंडन याची भेट झाली.शेट्टीची शरीरयष्टी बघून त्यांनी त्याला बॉक्सिंग चे ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली.त्यात तो चम्पिअन बनला.सलग आठ वेळा त्याने मुंबईतील बॉक्सिंगची स्पर्धा जिंकली.याच वेळी अभिनेता भगवान यांची नजर त्याच्यावर पडली.त्यांनी शेट्टीला बोलावले व त्यांचे सहकारी बाबुराव पहेलवान यांच्या बरोबर फाईट सीन घेतले व त्याला 200 रुपये दिले. त्यावेळी शेट्टीने ठरवले कि आपण आता सिनेमात जायचे. त्यावेळी हिंदी सिनेमात अजीमभाई हा प्रसिद्ध फाईट मास्टर होता. त्याच्या कडे शेट्टीने धडे घ्यायला सुरवात  केली.घोडेस्वारी,तलवारबाजी मार्शल आर्ट याचे ट्रेनिंग घेतले.त्याचा सहायक म्हणून काम करू लागला.त्याचबरोबर हिरोच्या डुप्लीकेटची कामे करू लागला.त्याने प्रेमनाथ,प्रदीपकुमार,प्राण यांच्या डुप्लीकेटची कामे केली.प्राण स्वता बॉक्सर होता. त्यांना शेट्टीचे काम आवडले.म्हणून त्यांनी त्यांची शिफारस सुबोध मुखर्जी कडे केली.त्यांनी त्याला मुनीमजी चित्रपटात फाईट मास्टरच पहिल्यांदा काम दिले.नंतर त्यांनी फाईट मास्टर म्हणून उजाला,बूट पोलीश,जबप्यार किसीसे होता है,काश्मीर कि कली ,तिसरी मंझील,अश्या अनेक,चित्रपटात काम केले.

नाईट इन लंडन मध्ये त्याला पडद्यावरचे काम मिळाले त्यात त्याने  डोक्याचा चमन केला. होता. त्याचवेळी  तो An evening in Paris मध्ये सुद्धा काम करत होता त्यात त्याला केस होते.पण दोन्ही चित्रपटात प्रोब्लेम येऊ लागल्याने त्याने चमन करायचे ठरवले.आणि नंतर तो कायम चमन करून काम करू लागला.त्यावेळी त्याला इतके काम होते कि तो ३ शिफ्टमध्ये काम करू लागला. प्रचंड पैसा मिळू लागला.बंगला, चार SUV गाड्या,घेतल्या.मोठ्या पार्ट्या देऊ लागला. त्याने दोन लग्न केली पहिली बायको विनोदिनी कथक डान्सर होती तिला चार मुले उदय,हृदय,छाया,किरण पुढे त्यानी दुसरे लग्न केले.तिचे नाव रत्ना.तिचा मुलगा रोहित.

एके दिवशी डायरेक्टर ब्रिज याच्या Bombay 405 miles चित्रपटात त्याचा  Assistant  मन्सूरला एक सीन करायचा होता. उंचावरून उडी मारायची व नंतर बॉम्ब फुटणार होता. पण ऐनवेळी टायमिंग चुकले व बॉम्ब आधीच फुटला. त्यात मन्सूर मेला. आपल्यामुळे मन्सूर मेला असे त्याच्या मनाने घेतले. तो दारूच्या आहारी गेला. कामे मिळणे बंद झाले. सगळे विकायची पाळी आली. एक दिवशी घरात घसरून बेड धरावा लागला. त्यातच त्याचा २३,जानेवारी १९८२मध्ये मृत्यू झाला. तेव्हा ज्यांना त्यांनी पार्ट्या दिल्या होत्या त्या पैकी एकही जण हजार नव्हता. फक्त डायरेक्टर ब्रिज हजर होता. त्याचा मुलगा रोहित मालाड पासून अंधेरी पर्यत पायी शाळेत जाऊ लागला. पण नंतर त्याने इतके नाव मिळवले कि आज तो एक चित्रपटाचे  डायरेक्टर म्हणून २५ कोटी घेतो. शेट्टीने फाईट मास्टर म्हणून सुमारे ७५ चित्रपटात काम केले. त्यातील प्रमुख बरसात कि एक रात, The Great Gambler, डॉन, दिवार, त्रिशूल, यादो कि बारात, Victoria NO 203, आप आये बहार आई, budha mil gaya, The Train इ.

त्याने सुमारे 70 चित्रपटात काम केले. त्याचे प्रमुख काम केलेले चित्रपट. The Great Gambler, शालीमार आझाद, त्रिशूल डॉन, कस्मे वादे, कालीचरण, रफू चक्कर, यादो कि बारात, Victoria NO 203, budha mil gaya, इ.

— रवींद्र शरद वाळिंबे.

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 87 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..