विजय कोपरकर संगीतातील नावाजलेले व अवघ्या महाराष्ट्राला माहिती असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९६२ रोजी झाला. वडील कीर्तनकार असल्यामुळे,विजय कोपरकर यांच्यावर लहानपणापासून गाण्याचे संस्कार झाले. वयाच्या आठव्या वर्षापासून गायनाला सुरुवात करून सुरवातीला मधुसूदन पटवर्धन त्यानंतर सुमारे पाच वर्षे डॉ. वसंतराव देशपांडे आणि मग पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे सात वर्षे त्यांनी गायनाचे शिक्षण घेतलं.विजय कोपरकर एका मुलाखतीत म्हणतात डॉ. वसंतराव देशपांडे सांगायचे, “”गुरूकडे शिक्षण घेतलं, तरी अभ्यासू नजरेने स्वतःच्या स्वतंत्र विचाराला पर्याय नाही, तरच ते गाणं त्या गायकाचं होतं. ‘‘ हीच वाट चालणारे, भरपूर विद्या मिळवून स्वतंत्र विचाराने स्वतःचं स्थान निर्माण करणारे आजचे प्रतिभावंत गायक म्हणजे मा.विजय कोपरकर. ते गेल्या चाळीस वर्षापासून स्वरसाधना करीत आहे. दिवसातील किमान सात ते आठ तास तंबोऱ्यासह रियाज असतो. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन वर्षे तू आता फक्त रियाज कर, असे सांगणारी माझी आई ग्रेट आहे, असे आपल्या आईबद्दल सांगतात. बुद्धिमान, व्यासंगी आणि मैफलीचे बादशहा शोभतील अशा दोन गानगुरूंचा सहवास आणि स्वतःचा रियाज, चिंतन यांनी विजय कोपरकर यांनी आपलं गाणं वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. अस्तु या मराठी चित्रपटातील ‘कोहम’ हे संस्कृत भाषेतलं गाणं विजय कोपरकर यांनी गायलं आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply