नवीन लेखन...

हिरकणी

हिंदी सिनेमात एक दृश्य नेहमी दिसते. हॉस्पिटलच्या पॉश कॉरिडॉरमध्ये हीरो अस्वस्थ फेऱया मारीत असतो. लाल दिवा लावलेल्या काचेच्या दरवाजातून एक नर्स धावत येते. “मुबारक हो आपको बेटा हुआ है,’ असे म्हणते. मग तो हीरो पळत आत जातो स्नेहार्द नजरेने हीरॉईनाचा हात हातात घेतो वगैरे…..

आज मी जी घटना सांगणार आहे ती एवढी सरळ रोमँटिक नाही. साधारण 10 वर्षांपूर्वी एप्रिल-मेच्या रणरणत्या उन्हात सोलापुरातल्या पहिल्या मजल्यावर असलेल्या एका कामगारांच्या दवाखान्यात भरगर्दीत एकजण केसपेपर काढून आरडाओरड करीत पुढे घुसून तपासणी खोलीत आला. त्याची घाई योग्यच होती. कारण त्याच्या गर्भवती पत्नीला कळा सुरू झाल्या होत्या. पाठोपाठ ती कृश स्त्री आली. पाहाताक्षणीच तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये ऍडमीट करण्याची गरज आहे हे कळले. तपासणी, कागदपत्रांची पूर्तता करून मी हॉस्पिटलला फोन लावला, तर नेमकी ऍम्ब्युलन्स दुसऱया पेशंटला आणायला गेली होती. नंतरचा पर्याय अर्थात रिक्षा…त्या माणसाला मी पटकन 20 रुपये दिले. तो रिक्षा आणायला गेला समजून मी गर्दीतल्या दुसर्‍या पेशंटकडे वळलो. पाचच मिनिटांत काउंटरवरच्या कर्मचार्‍याने सांगितले, `पेशंटला इथेच एकटे सोडून तो 20 रुपये घेऊन पळून गेला?’ `अशा अवस्थेत बायकोला एकटे सोडून! का पण?’ ओरडलो (माझ्याही नकळत). त्याही अवस्थेत त्याची बायको म्हणाली, `ते गेले आता गुत्त्यात! प्यायला!’ मी कपाळाला हात लावला. पेशंटच्या नवऱयावर मी टाकलेल्या विश्वासाला त्याने सुरुंग लावला होता. ताबडतोब दुसरी रिक्षा मागवून एका शेजारणीच्या सोबतीसह मी त्या स्त्रीला हॉस्पिटलमध्ये पोहोचविले. पाठोपाठ तिकडून फोन आला, ती स्त्री सुखरूप बाळंत झाली होती आणि या अनुभवाने तापलेले माझे डोके काहीसे शांत झाले.

प्रसूतीपूर्व गर्भसंस्कार करून आपले बाळ चांगले जन्मावे म्हणून अत्यंतिक काळजी घेणारे समृद्ध सुशिक्षित; मॅटर्निटी लिव्ह सोबत पॅटर्निटी लिव्ह एन्जॉय करणारे इलाईट नोकरदार; प्रसूतीपूर्व तपासणीचे महत्त्व; प्रसूती काळातला आहार लसीकरण यांचे महत्त्व सांगणारे राष्ट्रीय कार्यक्रम ः टीव्हीवरच्या या संबंधातल्या जाहिराती या सगळ्या गोष्टी माझ्या मनासमोरून सरकत गेल्या. या सगळ्या गोष्टी एकीकडे आणि कळा येणार्‍या आपल्या पत्नीला एकटे सोडून दारू प्यायला पळणारे पतीराज दुसरीकडे! खरंच, त्यावेळी त्या स्त्रीच्या मनात काय विचार आले असतील, आपला खंबीरपणा तिने कसा टिकवला असेल? आपल्या बाळाला त्याची जन्मकहाणी तिने सांगितली असेल? असंख्य प्रश्न मनात येत राहतात.

आठ मार्च महिलादिनाच्या बातम्या पेपरमध्ये वाचल्या, की मला त्या अनाम हिरकणीची आठवण येते आणि मी तिला मनोमन सलाम करतो.

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..