हिरवेगार तृणपाते,
वाऱ्यावर डोलत होते,
मजेत इकडून तिकडे,
मान करत गुणगुणत होते,—
लहान बालिश वय कोवळे,
कंच हिरव्या रंगात खुलत,
खुशीत झोके घेत होते,
बाळां काय ठाऊक असे,
किती कठीण असते जगणे-?
मौजमजा आणि हुंदडणे,
करत करत एकदम कोसळणे वास्तवाशी सामना होतां,
भलेभले धुळीस मिळती,
हे तर इवलेसे तृणपाते,
कितीशी असेल लढाऊ शक्ती,-?
कुणीतरी आले तिकडून,
पाय ठेवुनी उभे राहिले,
हिरवेगार तृणपाते मग,
पायाखाली ,चुरडले गेले,–!!!
वेदना, यातना, भोग प्रवास, तृणपाते कळवळले मनांत,
चिरडल्याने कुठेतरी आंत,
उद्ध्वस्तही सर्व मनोरथ,
किती दिवस आले, आणिक
आलेले ,गेले, संपले,–!!!
तृणपाते कोलमडलेले पुन्हा,
बघां,–उठून उभे राहिले,–!!!
करूण दशा त्याची पाहून,
वारा फुंकर घाली,
काळी आई तळमळून,
खालून त्याला कवटाळी,
सूर्यराज गगनी उभे,
वरुन किरणे सोडती,
प्रकाश देऊन आपुला,
अलगद कसे कुरवाळती,
शेतातील पाटाचे पाणी,
खळबळे सारखे खाली,
थेंब थेंब देई त्याला,
अलोट जगण्याची शक्ती,–!!!
तृणपाते राहिले उभे,
एकवटून सारी जीवनशक्ती,
संकटाशी सामना करते,
सरतेशेवटी इच्छाशक्ती,–!!!!
एवढेसे असून तृणपाते,
शिकवी केवढे आपणां,
डोंगर कोसळले संकटांचे,
तरी दाखवा कणखरपणां,–!!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply