आता कसला तो हिशेब सारा
शुन्यत्वाच्याच पलीकडले सारे
अथांग सागर नजरेत किनारा
सुखदुःखांचाच ताळमेळ सारा…
मायाममता अन प्रेम जिव्हाळा
ऋणानुबंधांचाच केवळ पसारा
कुणासाठी इथे न वेळ कुणाला
स्वार्थाचाच निरर्थक विंझणवारा…
नातीही सारी केवळ नावापुरती
प्रेमभावची निर्जीवी अंकुरणारा
फुलणे, गंधणे आज कोमजलेले
अत्तरकुपीतही, सुगंध उग्र न्यारा…
जगणे कलियुगातील असेच सारे
मानवतेचाच सर्वत्र दुष्काळ सारा
निव्वळ पैशासाठी सर्वत्र लाचारी
समाज सुजाणतेला धिक्कारणारा…
रचना क्र.५८
२६/६/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
Leave a Reply