जगी काय मिळविले काय हरविले
अंती एकच प्रश्न अनुत्तरीत असतो
हव्यासापोटी किती, काय हरविले
सत्यभास हा जीवा अविरत छळतो
सारीपाट ! उलगडता जन्मभराचा
अंती सारा सत्याचा हिशोब स्मरतो
झाले गेले, सारे जरी विसरुनी जावे
तरी गतकाळ नित्य आठवीत असतो
अंती पश्चातापाचे दग्ध दुःख अंतरी
जीव ! क्षणक्षण निश:ब्दीच जगतो
जगण्याविना, न दूजा मार्गच कुठला
प्रारब्धभोग जन्मभरी भोगावा लागतो
चित्रगुप्ता जवळी, चोख हिशोब सारा
बिनचूक खरा इथेच चुकवावा लागतो
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १३३
११ – १० – २०२१.
Leave a Reply