मला अजूनही उमगले नाही,..
शेंगदाणे 80 रूपये किलो होलसेल भावात…
1 किलो शेंगदाणे तेल गाळायला 3 किलो शेंगदाणे लागतात…हिशोब धरला तर एक किलो शेंगदाणे तेलासाठी रूपये 240…
3 किलो शेंगदाणे गाळायची वा तेल काढायची मजुरी 30 रूपये ..दहा रूपये एका किलोला.
मिळणारी शेंगदाणे पेंड / groundnut deoiled cake / खल्ली 2 किलो..ती 20 रूपये किलो….
एकूणच उत्पादन खर्च 240 अधिक 30 …बरोबर …रूपये 270
एकूण उत्पन्न एक किलो शेंगदाणे तेल साधारणपणे 120 रूपये , शेंगदाणे पेंड 40 रूपये दोन किलोची….टोटल उत्पन्न रूपये 160 रूपये …
आता मला सांगा , 270 रूपये धंद्यात लावून 160 रूपये उत्पन्न कोणता महाभाग काढेल….
तात्पर्य भारतातील सर्वच खाद्यतेल कंपन्या भेसळ करतात पामतेलाची , वापरलेल्या तेलाची , डालडाची , वनस्पती तूपाची अगदी 50 ते 90 % पर्यत .,,.
कसं राहील आरोग्य चांगलं नागरीकांचे….याचेच transfat बनतात हेच ते विषारी घटक ….
महात्मा गांधी सांगत “,खेडयाकडे चला , त्याचा गरभीत अर्थ हाच.”
आला ना हिशोब ध्यानात ……शुद्ध ….शुद्ध खाद्यतेलाचा….
आंधळी अन् बहिरी जनता , बेबस सरकारे अन् बेबस प्रशासन …
— मकरंद
चुकीच्या माहिती आणि गृहीतकांवर आधारित निष्कर्ष असेच चुकीचे असतात!!!
पहिली गोष्ट म्हणजे, घाऊक बाजारात भुईमुग साधारणतः ४००० Rs प्रति क्विंटल ने विकला जातो. कोणत्याही शेतमाल बाजारात चौकशी करावी. १ क्विंटल शेंगांपासून सुमारे ७०-७५ किलो शेंगदाणे मिळतात. त्यानुसार १ किलो शेंगदाण्याचा घाऊक भाव होतो ५३-५७ रुपये.
१ किलो शेंगांपासून सुमारे ४५% (म्हणजेच ४५० ग्रॅम) तेल मिळते.
यापुढे लेखकानेच दिलेल्या इतर गणिताचा वापर करून, एक किलो तेलाचे उत्पादन करण्यासाठी, सुमारे १३३रुपये टाकावे लागतात.
आणि त्याच गणिताचा वापर करून, व लेखकाने दिलेलाच विक्रीदर रु १६०/- धरल्यास, उत्पादकाला एक किलो तेलामागे २७ रुपये फायदा होतो.
काहीतरी सनसनाटी निर्माण करण्यासाठीच हा बिनबुडाचा लेख लिहिला आहे हाच निष्कर्ष या वरून काढता येतो!
असे दीड शहाणे लोकं देशात असल्याने भांडवलदाराचे फावते . शेंगदाणा आणि शेंगातील भावफरक नसमजणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा
Prafull अजून काही माहिती मिळाली तर सांगावी