एक दुखरी नस
प्रत्येकाला दिलीय देवाने
नको उतू मातू इतका
लपेटून अहंकाराने
आपल्या पोटापुरते
कमव कि स्वाभिमानाने
ओरबाडतोस कशाला
दुसऱ्याचे सुख दोन्ही हाताने
कितीसे लागते जगण्या
चूल पेटतेच कष्टाने
भाकरी पायी उगा कशाला
भरतो घड्यावर घडे पापाने
हिशोब नोंदला जातोच
यावर विश्वास ठेव मनाने
उडवू नको वाचेची धूळ
सोडव प्रश्न मौनाने!!
— वर्षा कदम.
Leave a Reply