हिशोबाची वही घेवूनी बसलो, हिशोब करण्यासाठीं
जमाखार्च तो करित होतो, जीवनाच्या सरत्या काठीं
घोड दौड ती चालूं असतां, सुख दु:खानी भरले क्षण
प्रसंग कांहीं असेही गेले, सदैव त्याची राही आठवण
कष्ट करूनी जे कमविले, थोडे धन या देहाकरिता
उपयोग नव्हता त्याचा कांहीं, जग सोडूनी देह जाता
कधी काळचा निवांतपणा, घालविला होता प्रभू सेवेत
पुण्य राहिले शिल्लकीमध्ये, फक्त तेवढेच हिशोब वहीत
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply