हिशोबाची वही घेवूनी बसलो, हिशोब करण्यासाठीं ।
जमाखार्च तो करित होतो, जीवनाच्या सरत्या काठीं ।।
घोड दौड ती चालूं असतां, सुख दु:खानी भरले क्षण ।
प्रसंग कांहीं असेही गेले, सदैव त्याची राही आठवण ।।
कष्ट करूनी जे कमविले, थोडे धन या देहाकरिता ।
उपयोग नव्हता त्याचा कांहीं, जग सोडूनी देह जाता ।।
कधी काळचा निवांतपणा, घालविला दुजाच्या सेवेत ।
पुण्य राहिले शिल्लकीमध्ये, वाटते तेवढेच हिशोब वहीत ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply