नवीन लेखन...

मलेरियाचा इतिहास – भाग ३

पृथ्वीतलावरील शेवटच्या बर्फ युगाचा अस्त व त्यानंतर वाढत जाणारे तपमान हा कालखंड अंदाजे १०,००० वर्षांपूर्वी झाला असावा. त्या काळापासून माणूस शेती करू लागला. पुढे शेतीचा प्रसार मध्य आफ्रिका, इराक , तुर्कस्थान या देशांतूनही झाला. शेती करण्याकरिता छोट्या झोपड्या भोवती पाणी साठविण्यासाठी पाणथळी, एकत्रित राहणाऱ्या मानवाच्या वसाहती अशा पद्धतीने जगण्याची संकल्पना सुरू झाली व ५००० ते ६००० वर्षांपूर्वी पर्यंत ती चांगलीच रुजली. परंतु त्याचबरोबर आपले पाय रोवण्यास डासांना उत्तम संधी मिळाली . माणसाचे रक्त हेच डासांचे खाद्य असल्याने सहजपणे उपलब्ध झालेल्या या रक्तपुरवठ्यामुळे हळूहळू धष्टपुष्ट डासांची पैदास वाढू लागली. मध्य आशिया खंडात माणसाबरोबर गाय, बैल यांसारखे पाळीव प्राणी आफ्रिकेपेक्षा जास्त प्रमाणात रहात असल्याने तेथील डासांची मानवी रक्त शोषण क्षमता २० ते ५० टक्केच राहिली. याउलट आफ्रिकेत माणसाबरोबर राहणाऱ्या पाळीव प्राण्यांचे प्रमाण अल्प राहिल्याने तेथील डासांची मानवी रक्त शोषण क्षमता ८० ते १०० टक्के राहिली. त्यामुळे मलेरिया या रोगाचा प्रादुर्भाव जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा आफ्रिकेत जास्त प्रमाणात राहायला आहे.

भारतात साधारण ३००० वर्षांपूर्वी तर युरोपात १००० वर्षांपूर्वी मलेरियाचे आगमन झाले असावे.

युरोपात ज्या देशात दलदलीच्या पाणथळी होत्या त्यांना Paludismo अथवा Palus(हा लॅटिन शब्द आहे)म्हणजे लगून म्हणत. या जागेतील साचलेल्या पाण्यामधून प्लेग व इतर धोकादायक तापाचे आजार निर्माण होतात याबाबत राज्यकर्ते जागरुक होते. म्हणूनच ११ व्या शतकात अनेक युरोपातील राजांना  Valencia नावाने एक फतवा काढला होता. तो असा होता की जो शेतकरी खेड्याला लागून शेती करेल, त्याला फाशीची शिक्षा मिळेल. अर्थातच यामुळे शेतकरी व राज्यकर्ते यांच्यात खडाजंगी होत असे. साधारणपणे असे लक्षात येऊ लागले होते की मनुष्य वस्त्यांजवळ जसजशी शेती वाढत गेली तसतसा मलेरिया रोगाचा प्रभाव वाढत गेला.

–  डॉ. अविनाश वैद्य

 

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..