मलेरियाला बळी पडलेल्या काही प्रमुख व्यक्तींची नावे याप्रमाणे आहेत.
१) राजा ऑगस्टस इटली इ.स. पूर्व ८१
२) अलेक्झांडर द ग्रेट इ.स. पूर्व ३२३ – भारतामधून विजय संपादून मेसोपोटेमिया मधून परत जाताना याला तापाची लागण झाली.
३) पहिला आर्च बिशप ऑफ कॅंटे बरी
४) जर्मन राजा हेन्रिक इ.स. ११९७
५) मंगोल राजा चेंगिजखान – अर्धे जग अतिशय क्रूरपणे पादाक्रांत करणाऱ्या राजा चेंगिजखान याला १२२७ मध्ये तापाने अनेक महिने पछाडले व वयाच्या ६० व्या वर्षी खंगलेल्या अवस्थेत त्याला मृत्यू आला.
६) प्रसिद्ध इटालियन तत्त्ववेत्ता व कवी – दांते इ.स.१३२१
७) सुलतान महमद तुघलक इ.स. १३५१
८) रोममधील व्हॅटीकन सिटी येथील अनेक पोप या आजाराला बळी पडले होते म्हणून या तापाला रोमन ताप म्हणत.
जगातील इतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना वारंवार येणाऱ्या तापाने ग्रासले होते. परंतु त्या सर्वांचे नशीब बलवत्तर ठरले व त्यांचा मृत्यू या तापाने झाला नाही. या व्यक्ती खालील प्रमाणे आहेत.
१) जॉर्ज वॉशिंग्टन यांना ५ वेळा
२) अब्राहम लिंकन – यांना लहानपणी अनेक वेळा तापाने बेजार केले होते.
३) जॉन एफ. केनेडी-१९४३ मधील दुसऱ्या महायुद्धात युद्धभूमीवर असताना ते तापाने हैराण झाले होते.
४) ख्रिस्तोफर कोलंबस – हा चौथ्यावेळी जगाच्या सफरीवर आशिया खंडाचा मार्ग काढण्यास निघाला होता, त्यावेळी तीव्र तापामुळे त्याला दौऱ्याच्या मध्यावरच परत फिरावे लागले.
५) व्हिएतनाम चे होचिमिन
६) महात्मा गांधी
७) अर्नेस्ट हेमिग्वे
८) मदर तेरेसा
९) जगप्रसिद्ध भारतातील शिकारी जिम कॉर्बेट
– डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply