नवीन लेखन...

कागदी चलनाचा इतिहास

सर्वप्रथम 13 व्या शतकात कागदी नोटा चलनात आल्या. त्यावेळी चीनने या कागदी नोटा चलनासाठी वापरल्या. पण 15 व्या शतकात येईपर्यंत चीनमध्ये कागदी नोटा बंद करण्यात आल्या. त्यानंतर 17 व्या आणि 18 व्या शतकात पश्चिम यूरोपातील देशांचा व्यापार आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात वाढला आणि तिथे खासगी बँका विकसित झाल्या.


पैसा ही एक मानवनिर्मित संकल्पना आहे. या संकल्पनेचा जन्म गरज म्हणून झाला असला तरी या पैशाने अवघं विश्व व्यापलं आहे. अ‍ॅडम स्मिथने 1776 मध्ये लिहिलेल्या ’वेल्थ ऑफ नेशन्स’ या पुस्तकातील एक वाक्य आहे. ‘देवाण-घेवाण हा इतर सर्व प्राणी जगतापेक्षा वेगळा असणारा गुणधर्म माणसाच्या अंगी आहे.’

थोडक्यात पैसा हा अनेक प्रकारांनी आपल्या आजूबाजूला असतो. आपण वापरतो ते कागदी चलन म्हणजे त्या पैशाचं एक दृश्य स्वरूप आहे. श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाला जगण्यासाठी पैसे हवेच असतात. चलनाचा आजवरचा प्रवास रंजक आहे. पण आजच्या काळात वापरले जाणारे कागदी चलनाची निर्मिती कशी होते हे जाणून घेण्यात अनेकांना रस असतो.

कागदी चलनाची निर्मिती कशी होते हे जाणून घेण्याआधी या कागदी चलनाच्या इतिहासातील काही टप्पे जाणले तर ही प्रक्रिया समजून घेणे अधिक सोपे जाईल. कागदी चलन निर्माण करण्याचे श्रेय चीन या देशाकडे जाते. चीनने जगाला अनेक गोष्टी दिल्या त्यापैकी एक म्हणजे कागदी चलन.

चीनमध्ये धातूंची कमतरता जाणवल्याने हाईन संग या राजाच्या कारकिर्दीत म्हणजे इ.सन 806-821 या काळात चलन म्हणून कागदी नोटा वापरण्यास सुरुवात झाली. नाणी वजनाला अधिक असतात त्यामुळे या नोटा वापरणे अधिक सोयीचे होते. पण प्रश्न विश्वासार्हतेचा देखील होता. त्यामुळे या चलनाचा प्रसार एकदम झाला नाही. हळूहळू या चलनाचा प्रसार होऊ लागला. इ.स. 1294 नंतर युरोपमध्ये कागदी चलन स्वीकारले गेले. पण मोठ्या प्रमाणावर हे चलन स्वीकारायला बराच अवधी जावा लागला. कागदी चलनाचा उगम चीनमध्ये झाला असला तरी त्याचा जोरदार प्रसार झाला तो अमेरिका आणि युरोपमध्ये. या प्रसाराला क्रांतीची पार्श्वभूमी आहे. इतिहासामध्ये कागदी चलनाचा जनक म्हणून बेंजामिन फ्रँकलिनचं नाव घेतलं जातं. त्यांनी कागदी चलनाला अधिक महत्त्व दिलं होतं.

अमेरिकेत कागदी नोटा स्वीकारायला जनतेमध्ये आधी साशंकता होती तेव्हा सरकारने जो कागदी चलन वापरून कर भरेल त्याला 5 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला. परिणामी चलन स्वीकारलं गेलं. आता कागदी चलन म्हणून आपण नोटांचा उल्लेख करतो कारण आधी या नोटा तुतीच्या झाडापासून लगदा करून बनवल्या जात. पुढे बनावट नोटा निर्माण होऊ नये म्हणून वॉटरमार्क आले. अशा प्रकारे नोटा अधिक सुरक्षित केल्या जाऊ लागल्या.

या दरम्यान गुटेनबर्गने छपाईच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लावल्यानंतर यूरोपमध्ये कागदी चलनाच्या प्रसाराला चालना मिळाली. तेव्हा यूरोपमध्ये दोन प्रश्न उभे राहिले होते. प्लेगमुळे माणसे मरत आणि त्यांच्या कपड्यांचे काय करायचे हा पहिला प्रश्न आणि छपाई करायची पण एवढा कागद निर्माण कसा करायचा. दोन्ही प्रश्नांचा ताळमेळ बसवण्यात आला, समस्या सुटल्या. भारतात 1835 मध्ये इंग्रजांनी देशभर एकच चलन असण्याचे ठरवले. आजही नोटा छापण्यासाठी जो कागद तयार केला जातो त्यात सुती कापड आणि ताग यांचाच वापर केला जातो. जगात सर्वत्र नोटा। बनविण्याची प्रक्रिया जवळपास सारखीच आहे. जगात नोटांसाठी कागद बनवणारे चार प्रमुख कारखाने आहेत.

कागदी नोटा चलनात आल्या तो इतिहास काही फार जुना नाही. 1500 वर्षांपूर्वी जगात देवाणघेवाणीसाठी बार्टर सिस्टमचा वापर केला जाई म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू दिली जाई. (उदा. गहूच्या बदल्यात तांदूळ) त्यानंतर 800 इ.स.पूर्व धातूपासून बनलेल्या नाण्यांचा वापर करण्यात आला. तसेच, 500 इ.स.पूर्व चित्रलिखित नाणी (र्झीपलह चरीज्ञशव) चलनात आली. 300 इ.स.पूर्व सोने आणि चांदीची नाणी दळणवळणासाठी चलनात आली. लोक खरेदीसाठी आणि व्यापारासाठी सोने आणि चांदीच्या नाण्यांचा वापर करु लागले. त्यानंतर अनेक वर्षांनी कागदी नोटा चलनात आल्या.

असं मानलं जात की, सर्वप्रथम 13 व्या शतकात कागदी नोटा चलनात आल्या. त्यावेळी चीनने या कागदी नोटा चलनासाठी वापरल्या. पण 15 व्या शतकात येईपर्यंत चीनमध्ये कागदी नोटा बंद करण्यात आल्या. त्यानंतर 17 व्या आणि 18 व्या शतकात पश्चिम यूरोपातील देशांचा व्यापार आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात वाढला आणि तिथे खासगी बँका विकसित झाल्या. त्यानंतर पहिल्यांदा खासगी बँकांनी कागदी नोटा चलनात आणल्या आणि त्यानंतर जगभरात कागदी नोटा चलनात आल्या. 

स्वतंत्र भारत आणि कागदी नोटा

भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर देखील इंग्रजांनी चलनात आणलेल्या मुद्राच भारतात सुरू राहिल्या. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच भारतीय रुपयाचा इतिहास – History of Indian Currency सुरू होतो. 1949 साली जेंव्हा भारताची पहिली नोट चलनात आली तेंव्हा तिचे स्वरूप अगदी भिन्न होते, पहिली नोट ही एक रुपयाची होती, या नोटेवर सारनाथ च्या सिंहाची अशोक स्तंभाची प्रतिकृती छापण्यात आली होती. पुढे नोटांचे स्वरूप वारंवार बदलत गेले, ठइख ने भारतातील वेगवेगळ्या इमारतींची छायाचित्र दर्शविणाऱ्या अनेक नोटा चलनात आणल्या. यात गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India), बृह्देश्वर मंदिर (Brihadisvara Temple) चे छायाचित्र देखील छापण्यात आले. इतकेच नव्हे तर 1953 साली भारत सरकारने जी नोट छापली त्यावर हिंदी भाषेत लिहिण्यात आले.

भारतात कागदी नोटांचा वापर 19व्या शतकातच सुरू झाला होता. त्याआधी ब्रिटिश ईस्ट इंडियाच्या अधिपत्याखालील बंगाल प्रांतातही कागदी चलन वापरात आलं होतं. पण चलनाचा पाया मानला जाणारा रुपया 1917पर्यंत नाण्याच्या रुपात मिळायचा. ब्रिटिश अधिपत्याखालील भारतात एक रुपयाची नोट चलनात आल्यावर भारतातील इतर युरोपीय वसाहतींनीही मग एक रुपयाची नोट जारी केली. भारतातील काही संस्थानिकांनीही अंतर्गत व्यवहारांसाठी स्वतंत्र चलन जारी केलं होतं. हैदराबाद आणि काश्मीरच्या संस्थानिकांना एक रुपयाची नोट छापण्याची परवानगी मिळाली होती.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रह्मदेशामध्ये (आताचं म्यानमार) वापरासाठी एक रुपयाच्या नोटा जारी करण्यात आल्या. दुबई, बहारीन, ओमान अशा मध्यपूर्वेतील देशांमध्येही एके काळी भारतीय चलन वापरलं जायचं. त्यासाठी भारत सरकारनं मग 1959 साली खास ‘पर्शियन एक रुपया’ही छापला होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इंग्लंडच्या राजाऐवजी भारतीय राजमुद्रेला एक रुपयाच्या नोटेवर स्थान मिळालं. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर जारी करण्यात आलेली एक रुपयाची नोट काही काळ पाकिस्तानातही चलनात होती.

गेल्या शंभर वर्षांत एक रुपयाच्या 125 वेगवेगळ्या नोटा चलनात आल्या. एकूण 28 वेळा या नोटांचं डिझाईन बदललं गेलं.

एक रुपयाचं महत्त्व आजही कायम

एक रुपयाचं मूल्य आज जरी खूप जास्त नसलं तरी एक रुपयाच्या नोटेचं महत्त्व मात्र कायम आहे. भारतीय चलनात एक रुपयाची नोट ही सर्वांत लहान, पण तरीही सर्वांत मोठी म्हणायला हवी. कारण केवळ एक रुपयाची नोटच भारत सरकार थेट चलनात आणतं, तर बाकीच्या नोटा रिझर्व्ह बँकेमार्फत जारी केल्या जातात. त्यामुळं एक रुपयाच्या नोटेवर ’भारत सरकार’ असा उल्लेख असतो आणि भारताच्या वित्त सचिवांची स्वाक्षरी असते. अन्य नोटांवर ’भारतीय रिझर्व्ह बँक’ असं छापलं असतं आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते.

छपाईसाठी बराच खर्च

व्यवहारात एक रुपया मूल्य असलेल्या या नोटेच्या छपाईसाठी मात्र बराच खर्च येतो. त्यामुळं 1995 साली एक रुपयाच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. आता कॅशलेस सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. पण कागदी चलनाची जादू अजूनही कायम आहे. भविष्यात या कागदी चलनाचा प्रवास कसा असेल, त्या टिकतील का? असे प्रश्न आहेत पण लोकांचा कागदी चलनावरचा विश्वास अजूनही कायम आहे. अगदी प्रगत देशातसुद्धा! स्वीडन हा देश कॅशलेस दिशेने गेला आहे पण तो एक अपवादच म्हणावा लागेल.

–व्यास टीम
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे  दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..