नवीन लेखन...

प्लास्टिकचा इतिहास – भाग १

मायकेल फेरेडेने असे निरीक्षण केले की, गुट्टा पर्चा चीक (मलाया द्विपकल्पामधील पर्चा नावाच्या झाडापासून मिळणारे चीक/रबर) उत्तम विद्युतरोधक असतो व त्यावर पाण्याचा अजिबात परिणाम होत नाही. या गुणधर्मामुळे ट्रान्स अटलांटिक केबलवर पर्चाच्या झाडाच्या चिकाचे आवरण दिले गेले. आजही हे आवरण समुद्राच्या पाण्यातून जाणाऱ्या केबलवर देतात. पर्चा झाडाचा चीक हा एक प्लास्टिकसदृश पदार्थ होता.

१८६२ साली अलेक्झांडर पार्कस् याने लंडनमधील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सेल्युलोज नायट्रेट व कापूर मिसळून पहिले कृत्रिम प्लास्टिक बनवले. त्यापासून त्याने चाकू, सुऱ्यांच्या मुठी, गुंड्या, बटणे, कंगवे, टाक, पेन्सिलीची टोपणे वगैरे वस्तू बनवल्या. या प्लास्टिकला त्याने ‘पार्क साइन’ असे नाव दिले. १८९७ साली डब्ल्यू क्रिशे याने दुधाच्या प्रोटीनपासून प्लास्टिक बनवले. त्याला ‘केसिन प्लास्टिक’ म्हणत. त्यापासून त्याने सुऱ्यांच्या मुठी, छत्र्यांचे दांडे बटणे, कंगवे इत्यादी वस्तू बनवल्या. आणि या वस्तू ज्वलनशीलही नव्हत्या. अॅडोल्फ स्पिटलर याला असे आढळून आले की केसिन प्लास्टिकपासून बनवलेले तक्ते फॉर्मल्डिहाइडच्या द्रावात बुचकळले तर त्यावर पाण्याचा अजिबात परिणाम होत नाही. या केसिन प्लास्टिकचा उपयोग केसिन ॲडेसिव्ह बनवण्यासाठी करता येऊ लागला.

अॅडोल्फ बायरचे संशोधन पुढे बेकलंड या शास्त्रज्ञाने चालू ठेवले व फिनोल आणि फॉर्मल्डिहाइड रेझिन्स बनवली. त्यांना पुढे बेकलाइट असे म्हटले गेले. १९२४ साली स्टाउडिंगरने प्लास्टिक व रबर ही लांब साखळी असलेल्या रेणूंपासून बनलेली असतात, असे सिद्ध केले. स्टाउडिंगरला पुढे रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळाला.

१९२७ साली आणि पीव्हीसी सेल्युलोज अॅसिटेट, तर १९२८ साली अॅक्रिलिकचा शोध लागला. ॲक्रिलिकचा वापर लढाऊ विमानांच्या खिडक्यांच्या काचा, वैमानिकाच्या बैठकीवरील छत (कोकपीट) बनवण्यासाठी करतात. कारण ॲक्रिलिक काचेपेक्षाही पारदर्शक असते. १९२९ साली युरिया फोर्मल्डिहाइड व १९३० साली पॉलिस्टायरीनचे उत्पादन सुरू झाले. ड्यू पोण्ट कंपनीतील शास्त्रज्ञांनी नायलॉन ६६ या प्लास्टिकच्या धाग्याचा शोध लावला. १९३६ साली पॉलिक्रिलोनायट्रील स्टायरीन, अॅक्रिलोनायट्रील व पॉलिव्हिनल अॅसिटेट यांचा उगम झाला. तर १९५२ साली झिग्लरने पॉलिथिलीनचा शोध लावला.

अ.पां. देशपांडे, (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..