स्थितप्रज्ञ असा समुद्र आणि
तितकंच अथांग असं आकाश
एकमेकांना भेटतात
क्षितिजाच्या तितक्याच प्राचीन रेषेवर
आणि ती चिरंतन रेषा जपून ठेवते
त्यांच्यातल्या जुन्या संदर्भांचे दाखले..
त्या हितगुजाचे अर्थ जाणवतात फक्त
त्या समुद्राला,आकाशाला आणि त्या क्षितिजाला
काही हितगुजं शब्दातीत असतात हेच खरं…
—आनंद
Leave a Reply