हरी ॐ ||
होळी मुंबईत पौर्णिमेला,
रंगपंचमी प्रतिपदेला !
मुंबईतली ही प्रथा निराळी,
काय आहे यातील अएडजेष्ठमेंटली !
हौसेला नसते मोल,
म्हणून जातात सर्वांचे तोल !
होळी समोर दुसऱ्यांना बोंबा,
लाजा आणायच्या सर्वांच्या तोंडा !
प्रथा परंपरांचे आणायचे सोंग,
दाखवायचा दिमाख, करायचे ढोंग !
कसे पडावे यातून बाहेर ?
इच्छा शक्तीचा नाही जोर !
प्रथा परंपरेचे पांघरूण घेऊन,
वेदनाशक्ती हरवतो भांग पिऊन !
रंगपंचमीच्या दिवशी विषारी रंगांची उधळण,
चेहेऱ्याची विद्रुपता हीच आमची ओळखण !
नाही रंगविले सोसायटीचे जीने आणि भिंती,
असे होणेच नाही रंगपंचमीच्या दिवशी !
शासन व पालिका सांगते पाणी जपून वापरा,
कश्याला फोडता आमच्या डोक्यावर खापरा ?
नाहीका फुकट पाणी वापरत झोपड-पट्टीवाले ?
तेंव्हा कुठे असतात हेच शासन व पालीकेवाले ?
देणार नाही अद्वातद्वा शिव्या होळीपुढे,
जाळणार मनातील कुतर्क आणि भ्रष्टाचार होळीपुढे !
मारणार नाही पाण्याचे फुगे
रस्त्यावरील माणसांना आणि मुलींना,
तोडणार नाही झाडे होळीसाठी,
लावणार, जगवणार झाडे पर्यावरणाच्या रक्षणासाठी !
येणाऱ्या प्रत्येक वर्षी हाच संदेश घेऊन आम्ही साजरी करू होळी आणि रंगपंचमी !!
जगदीश पटवर्धन वझीरा, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply