नवीन लेखन...

हॉलीवूडची सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री ग्रेटा गार्बो

Hollywood Actress Greta Garbo

हॉलीवूडची सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री ग्रेटा गार्बो यांचे मूळ नाव ग्रेटा लूव्हिसा गस्टाव्हसॉन. ग्रेटा गार्बो यांचा जन्म १८ सप्टेंबर १९०५ रोजी स्वीडन मधील स्टॉकहोम येथे झाला.

ग्रेटा गार्बो या वयाच्या चौदाव्या वर्षी पदवीधर झाल्या. वडिलांच्या मृत्यूनंतर घरच्या गरिबीमुळे त्यांना अनेक प्रकारची कामे करावी लागली. पुढे एरिक पेटशलर या दिग्दर्शक-अभिनेत्याशी तिची योगायोगाने गाठ पडली. त्याच्या प्रयत्नामुळेच त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

पीटर द ट्रॅम्प या चित्रपटात प्रथम त्यांनी १९२२ मध्ये काम केले. पुढे १९२२ ते १९२४ या कालावधीत स्टॉकहोम येथील रॉयल ड्रॅमॅटिक थिएटरमध्ये त्यांनी अध्ययन केले, याच काळात त्यांचा मॉरिटस स्टीलर या स्वीडिश दिग्दर्शकाशी परिचय झाला. त्यांनी ग्रेटा गार्बो यांना दि स्टोरी ऑफ गोस्टा बर्लिंग या चित्रपटात महत्त्वाची भूमिका दिली. याच वेळी तिचे मूळ नाव बदलून ग्रेटा गार्बो असे ठेवण्यात आले. १९२५ मध्ये त्या स्टीलरसमवेत अमेरिकेला गेल्या. अमेरिकेमध्ये ग्रेटा गार्बो यांनी मेट्रो गोल्डविन मेयर या कंपनीच्या २४ चित्रपटांतून काम केले. त्यांपैकी द टॉरंट (१९२६), फ्लेश अँड द डेव्हिल (१९२७), लव्ह (१९२७), वाइल्ड ऑर्किड्स (१९२९), अॅाना ख्रिस्ती (१९३०), माताहारी (१९३१), ग्रँड हॉटेल (१९३५), अॅाना कॅरेनिना (१९३५), कॅमिल (१९३७) व निनोत्‌च्‌का (१९३९) हे तिचे प्रमुख व नावाजलेले चित्रपट होत. त्यांतही द टोरंट हा तिचा पहिला अमेरिकन चित्रपट आणि अॅ२ना ख्रिस्ती हा तिचा पहिला बोलपट होता. टू फेसेड वुमन (१९४१) या चित्रपटानंतर ग्रेटा गार्बो चित्रपटक्षेत्रातून निवृत्त झाली.

ग्रेटा गार्बोच्या भूमिकांमुळे चित्रपटातील स्त्रीभूमिका अधिक नैसर्गिक, प्रगल्भ व उज्ज्वल बनली. स्त्रीभूमिकांना एक प्रकारचा उच्च दर्जा प्राप्त झाला. आकर्षक शरीरयष्टी, पिंगट केस, निळसर डोळे, गूढ पण मधुर हास्य व अभिनयकुशलता या गुणांमुळे चित्रपटसृष्टीत त्यांना ‘डिव्हाइन गार्बो’ म्हणत असत. कॅमेऱ्यासमोर विलक्षण सहजतेने काम करण्याच्या तिच्या नैसर्गिक प्रवृत्तीचे दिग्दर्शकांनी व चित्रपटसमीक्षाकांनी विशेष कौतुक केले आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील सर्वश्रेष्ठ चित्रपट अभिनेत्री म्हणून त्यांचा गौरव केला जातो.

बुद्धिमत्तेची चमक, विलोभनीय सौंदर्य आणि कलात्मक अलिप्तता या सर्व गुणांमुळे ती एक अनन्यसाधारण अभिनेत्री ठरली. गार्बो यांनी अवघ्या १९ वर्षे हॉलीवुड मध्ये काम केले. या दरम्यान त्यांनी एकूण २७ चित्रपटांमधे काम केलं. वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांनी निवृत्ति पत्करली. निवृत्तीनंतर १९५१ मध्ये त्यांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले. सुचित्रा सेन यांना आपल्या तत्वनिष्ठतेमुळे भारतीय ‘ग्रेटा गार्बो’ असे संबाधले जात असे.

ग्रेटा गार्बो यांचे १५ एप्रिल १९९० निधन झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..