हॉलीवूडचा प्रसिद्ध गायक जस्टीन बीबर (Justin Bieber) चा जन्म १ मार्च १९९३ रोजी झाला.
जस्टीन केवळ परदेशातच नव्हे तर भारतात देखील खूप प्रसिद्ध आहे. अगदी लहान वयातच जस्टीनने इतकी प्रसिद्धी मिळविली की बॉलिवूड स्टार्ससुद्धा त्याच्यासमोर फिके पडले. जस्टीन १२ वर्षांचा होता, तेव्हापासून तो गाणे म्हणत आहे. एवढेच नव्हे तर, जस्टीन यूट्यूबवर सर्वाधिक सबस्क्राईबर मिळवणारा पहिला पुरूष गायक देखील आहे. जस्टीन बीबर आज सुपरस्टार बनण्यात त्याची आई पॅटी मॅलेटीचा सर्वात मोठा हात आहे. जस्टीनला गाणे आवडत असे आणि तो बऱ्याचदा गाणे गायचा. एक दिवस आईने त्याच्या नकळत लपून त्याचे गाणे रेकॉर्ड केले.
जस्टीनचा पहिला यूट्यूब व्हिडिओ त्याच्या आईनेच यूट्यूबवर अपलोड केला होता. जस्टीनचा हा व्हिडिओ कोट्यावधी लोकांनी पाहिला आणि जस्टीन प्रसिद्ध झाला. युट्यूबवर जस्टीनचे गाणे ऐकल्यानंतर, व्यावसायिक स्कूटर ब्रॉनने त्याला संगीताच्या दुनियेत प्रवेशासाठी तयार केले. यानंतर जस्टीनला मागे वळून पाहण्याची गरजच पडली नाही. तथापि, तो बऱ्याच वर्षांपर्यंत डिप्रेशनचा बळीही पडला आहे.
जस्टीन बीबरला टॅटूचा खूप छंद आहे. जस्टीन इतक्या लहान वयात आंतरराष्ट्रीय गायक बनला आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या जस्टीनची इतक्या लहान वयात कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. बर्यानचवेळा तो वादाचा भागही बनला आहे. जुलै २०१३ मध्ये, जस्टीनवर हॉटेलच्या बाल्कनीतून खाली उभे असलेल्या चाहत्यांवर थुंकण्याचा आरोप होता. मात्र, त्याने याचा इन्कार केला. जस्टीन एका वर्षात तब्बल ८० दशलक्ष डॉलर्स कमावतो, म्हणजेच पाच अब्ज रुपये. काही वृत्तानुसार, २०२० साली जस्टीनची एकूण संपत्ती २८५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे २० अब्ज रुपये होती. फोर्ब्स मासिकाच्या म्हणण्यानुसार, जस्टीन चार वेळा जगातील १० सर्वात शक्तिशाली सेलिब्रिटींमध्ये यादीत सामिल झाला आहे. जस्टीन बीबरच्या संगीत अल्बमने १० दशलक्षाहून अधिक संगीत रेकॉर्ड विकल्या आहेत. आजकाल तो आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद लुटत आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply