हॉलीवुडचे प्रख्यात कथाकार, पटकथाकार सिडने शेल्डन यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९१७ रोजी शिकागो येथे झाला.
सिडने शेल्डन हा अनेक यशस्वी नाटक, चित्रपट, लिहणारा सुप्रसिद्ध एक लेखक, निर्माता, दिग्दर्शक होता. त्याने आपल्या ओघवत्या शैलीने अनेक कादंबर्याथ लिहुन अक्षरशः जगाला वेड लावले,
चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटाशी स्पर्धा असताना, त्याला सर्वोत्कृष्ट कथेसाठी ऑस्कर एवॉर्ड मिळाला. त्याने बनवलेल्या टी. व्ही. सिरीअल्स लोकांनी डोक्यावर घेतल्या, त्याने आपल्यासाठी लिहावे, म्हणुन मोठमोठ्या स्टुडीओ मालकांनी त्याच्या घरासमोर रांगा लावल्या.
‘द अदर साईड ऑफ मी’ नावाचं पुस्तक हे सिडनेनी स्वतःच्या ओघवत्या भाषेत लिहलेलं, स्वतःचं आत्मकथन आहे.
३० जानेवारी २००७ रोजी सिडने शेल्डन यांचे निधन झाले.
– संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply