ब्रॅड पिट यांचा जन्म १८ डिसेंबर १९६३ रोजी शॉनी, ओक्लाहोमा, अमेरिका येथे झाला.
ब्रॅड पिट हे गेल्या ३३ वर्षांपासून हॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी आपल्या करिअरमध्ये एकाहून एक अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण एवढ्या वर्षात त्यांना एकदाही ऑस्करला गवसणी घालता आली नाही. अखेर ३३ वर्षांनंतर वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड सिनेमासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला. अनेक बॉलिवूड चित्रपटांमुळे आज जगभरातील लोक त्यांना ओळखतात. पण ब्रॅडलाही यश सहज सापडले नाही. आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्याने बालपणापासूनच खूप परिश्रम घेतले आहेत.
ब्रॅड यांचे वडील विल्यम विलियम एल्विन पिट हे एका ट्रक कंपनीचे मालक होते आणि आई जेन एटा शाळेत नोकरी करतात. ब्रॅड त्याच्या पालकांचा पहिला मुलगा होता. शाळेत माध्यमिक शिक्षण घेत असताना त्यांनी खेळातही भाग घेतला. १९८२ मध्ये त्यांनी मिसौरी विद्यापीठात पत्रकारितेचे शिक्षण घेतले. पण पदवी मिळवण्यापूर्वीच त्यांना हे माहित होतं की आपल्याला चित्रपटांमध्ये रस आहे आणि यामध्ये आपली कारकीर्द बनवायची आहे. शेवटी त्यांनी अभिनेता होण्यासाठी कॉलेज सोडले आणि लॉस एंजेल्समध्ये गेले.
लॉस एंजेलिसमध्ये राहण्यासाठी आणि खाण्यासाठी ब्रॅड पिट यांना पैशांची गरज होती आणि पैसे मिळवण्यासाठी त्यांनी लिमोझिन ड्रायव्हर म्हणूनही काम केले. दरम्यान, ब्रॅड पिट यांनी ‘फ्रेडीज़ नाइटमेयर्स’व ‘ग्रोइंग पेन्स’या टीव्ही मालिकेत काम केले. १९८७ मध्ये ब्रॅड पिट यांनी लेस दैन जीरो’, ‘नो वे आउट’ आणि ‘नो मैन्स लैंड’ यासारख्या चित्रपटात अगदी छोट्या भूमिका साकारून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली. १९८८ मध्ये आलेल्या ’21 जम्प स्ट्रीट ‘या चित्रपटामध्ये त्याने विनोदी भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी ‘डार्क साइड ऑफ द सन’ या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम केले. परंतु असे असूनही त्यांनी ‘कटिंग क्लास’ आणि ‘हॅपी टुगेदर’ यासारख्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या. ‘थेलमा अँड लुईस’ चित्रपटात त्याने एका गुन्हेगाराची भूमिका साकारली होती. फक्त, या भूमिकेमुळे त्यांना एक चांगला अभिनेता म्हणून ओळख मिळाली’
काही वर्षे अभिनय केल्यावर, त्याने जेनिफर एनिस्टन आणि ब्रॅड ग्रे यांच्या सहकार्याने प्लॅन बी एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली. या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट ‘ट्रॉय’ २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. आज ‘प्लॅन बी’ एन्टरटेन्मेंट ही एक अतिशय यशस्वी प्रॉडक्शन कंपनी आहे, जिने बर्या्च चित्रपटांची निर्मिती केली. ब्रॅड पिट यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ब्रॅड त्याच्या अभिनयासोबतच लुकसाठीही फार प्रसिद्ध आहे.त्यांनी स्वत: ची वेगळी ओळख निर्माण करून चित्रपट निर्मितीतही यश संपादन केले असून अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. ब्रॅड पिट आणि अँजेलिना ही एकेकाळीची सगळ्यात लोकप्रिय जोडी होती. मि. अँड मिसेस.स्मिथ या चित्रपटादरम्यान दोघांची ओळख झाली आणि त्याचं प्रेमात रुपांतर झाले. व ब्रॅड पिट यांनी अँजेलिना जोलीशी २००४ मध्ये लग्न केले आणि दोघे जवळजवळ १२ वर्षे एकत्र राहिल्यानंतर २०१६ मध्ये वेगळे झाले. त्यांची जोडी जगभरात ‘ब्रेंजलिना’ म्हणून प्रसिद्ध होती.
ब्रॅड पिटचे हे दुसरे लग्न होते यापूर्वी त्यांनी २००० मध्ये अभिनेत्री जेनिफर ऍनिस्टशनी लग्न केलं होतं, मात्र २००५ साली ते वेगळे झाले. तर अँजलिना जोलीचं हे तिसरे लग्न होते.
Leave a Reply