भयकथा लेखक नारायण धारप यांचा जन्म २७ ऑगस्ट १९२५ रोजी झाला.
नारायण धारपांच्या गूढकथांचे गारूड अजूनही मराठी वाचकांच्या मनावर आहे. त्यांचा जन्म आणि मृत्यू ऑगस्ट महिन्यातलाच. नारायण धारप यांची प्रामुख्याने भयकथा, गूढकथांकरता ख्याती होती. अंगावर सरसरून काटा येईल अशी शैली आणि मांडणी हे नारायण धारपांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य. नारायण धारप यांनी १९५१ मध्ये लेखनाला सुरुवात केली. ५० वर्षांहून अधिक काळ ते लिहीत राहिले. सुरुवातीच्या त्यांच्या भयकथा, विज्ञानकथा यांची जरी उपेक्षा झाली तरी पुढे त्यांच्या लेखनाचा असा वाचकवर्ग तयार झाला. नारायण धारप यांनी निर्मिलेले “समर्थ” हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गूढकथा विशेष गाजल्या. धारप यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात बी.एस्सी.टेक पदवी मिळवली. नारायण धारप नोकरीनिमित्त काही काळ आफ्रिकेत वास्तव्यास होते. नंतर ते भारतांत आले आणि त्यांनी अनेक छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या.
अघटित हे त्यांचे सर्वांत पहिले पुस्तक प्रकाशित झाले आणि ते बऱ्यापैकी वाचकांच्या पसंतीस उतरले. हयामुळे हुरूप येऊन त्यांनी “अत्रारचा फास”, “अंधारयात्रा” अशी आणखीन दोन पुस्तके प्रकाशित केली जी अतिशय तुफान लोकप्रिय झाली. पण त्यांचे नाव मराठी मनात बसले ते त्यांच्या अनोळखी दिशा ह्या कथासंग्रहामुळे. त्या काळी ह्या पुस्तकांच्या हजारो प्रति खपल्या आणि प्रत्येक रेल्वे बस स्टेशनवर ह्या प्रति विकल्या जायच्या. नारायण धारप ह्यांचावर मराठी वाचकांचे प्रेम अशा साठी जमले कि त्याच्या कथा वेगळी धाटणीच्या होत्या. नारायण धारप यांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन लिहिला गेलेला “तुंबाड” हा हिंदी चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन केले आहे राही अनिल बर्वे यांनी.
नारायण धारप यांचे १८ ऑगस्ट २००८ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply