सूत्रसंचालक, अभिनेते, दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे यांचा जन्म ३० जून १९८६ रोजी सासवड येथे झाला.
निलेश साबळे यांचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय दहिवडी येथे झाले. निलेश साबळे यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्याच्या घरातील कोणालाही अभिनयाची पार्श्वलभूमी नाही, तरीही या क्षेत्रात जिद्दीनं उतरायचं आणि यशस्वी व्हायचं हा ध्यास कायम मनी बाळगलेला. घरातून, “आधी शिक्षण आणि मग इतर’ अशी सक्त ताकीद असल्याने बीएएमएस (आयुर्वेद) ही डॉक्टरकीची पदवी चांगल्या गुणांनी मिळविली. वाशी येथे काही काळ नोकरी केली. गडहिंग्लज (कोल्हापूर) येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना एकपात्री प्रयोग केले. अभिनयाची खरी सुरवात बारावीत असताना “हसरी फसवणूक’ या एकपात्रीपासून झाली. भोर येथील राजगड ग्रुपमधील सहकाऱ्यांसह प्रकाश मोरे, प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, महेश कोठारे, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, राकेश सारंग यांचे मार्गदर्शन मिळाले. अवधूत गुप्ते, मिलिंद गुणाजी यांच्यासमवेत कार्यक्रम केले. “हास्यसम्राट’मध्ये पाहुणा कलाकार, ई-मराठीवरील “नान्याच्या गावाला जाऊ या’ या मालिकेत काम केले. शिक्षण घेत असताना एकपात्री, मिमिक्रीच्या माध्यमातून स्वतःतील कलाकार कायम जिवंत ठेवला. ते स्वत: चांगले गातात, दिग्दर्शन करू शकतात, चित्रकार काढतात, अभिनया व्यतिरिक्तच्या या गोष्टी फारच कमी लोकांना माहीत आहेत. “महाराष्ट्राचा सुपरस्टार’, “फू बाई फू’, “होम मिनिस्टर’, “दुभंग’ (मराठी चित्रपट) आणि चला.. हवा येऊ द्या”असा त्यांचा प्रवास आहे.
निलेश साबळे यांना आपल्या समुहाकडुन वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply