जन्म.३० डिसेंबर १९६८ चंदीगड येथे.
सिलिकॉन व्हॅलीत चमक दाखविणाऱ्या पहिल्या पिढीचे भारतीय उद्योजक सबीर भाटिया यांनी आपल्या छोट्या कारकीर्दीत यशापयशाची ही दोन्ही टोके अनुभवली. चंदीगडमधल्या एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या सबीर भाटियांचं सुरवातीच्या काळातलं शिक्षण भारतातचं झालं. नंतर त्यांनी अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधे एमएस केलं. काही काळ जगप्रसिद्ध ॲपल कंपनीत काम केलं. १९९४ मधे आपल्या एका सहकारी जॅक स्मिथच्या सोबत स्वतःचं काम सुरू केलं. सबीर भाटिया आणि जॅक स्मिथ या दोघांच्या डोक्यात हॉटमेलची कल्पना अगदी सहज गप्पा मारता मारता आली आणि गुंतवणूकदारांच्या मदतीनं त्यांनी ४ जुलै १९९६ रोजी ‘हॉटमेल कॉर्पोरेशन’ ही कंपनी स्थापन केली.
सुरवातीला ‘हॉटमेल कॉर्पोरेशन’ कंपनीचे चौदापैकी तीनच पगारी कर्मचारी होते. अर्थात हॉटमेलच्या प्रगतीबरोबर त्यांचीही संख्या वाढून ६० झाली. सुरवातीपासून कॅलिफोर्नियामधल्या सनीवेलस्थित ‘हॉटमेल कॉर्पोरेशन’ या कंपनीनं मेलची सुविधा सर्वसामान्य जनतेसाठी मोफत द्यायला सुरवात केली. इंटरनेटचा जन्म झाल्यावर ही सुविधा मोफत देणारी ही पहिलीच कंपनी होती. त्याबरोबर लोकांनी धडाधड हॉटमेल मध्ये आपली खाती उघडायला सुरवात केली. पहिल्याच वर्षी हॉटमेलचे एक कोटीहून जास्त सभासद झाले होते. त्यावेळी सगळ्यात प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन ऑनलाईन (AOL) या ई-मेल कंपनीलाही हॉटमेलनं मागं टाकलं. अमेरिका ऑनलाइनला सहा वर्षांत जेवढे ग्राहक मिळाले त्यापेक्षाही जास्त ग्राहक हॉटमेलला दोन वर्षांत मिळाले! या हॉटमेलवर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्सही त्यावर फिदा झाला आणि १९९८ साली त्या काळी ४० कोटी अमेरिकन डॉलरला मायक्रोसॉफ्टनं ‘हॉटमेल’ खरेदी केली! मायक्रोसॉफ्टशी करार झाल्यावर कंपनीचे सगळे साठच्या साठ कर्मचारी चक्क कोट्यधीश झाले होते.
सबीर भाटिया यांनी मायक्रोसॉफ्टला ‘हॉटमेल’ विकल्यावर त्यांनी वर्षभराच्या अंतराने ‘आरजू’ ची मुहूर्तमेढ रोवली होती. पण तंत्रज्ञानाचे जागतिक दालन अल्प गुंतवणुकीत उपलब्ध करून देणारे व्यासपीठ हे आरजू ने निवडलेले सेवा क्षेत्र तत्सम डझनावारी साइट्स इंटरनेटवर उपलब्ध असल्याने सपशेल अपयशी टरले. २००१ मध्ये अखेर सबीर भाटिया यांना आरजूचा हा प्रयोग गुंडाळावा लागला. २००६ मध्ये सबीर भाटिया यांनी ‘आरजू डॉट कॉम च्या नव्या रूपातील पुनरागमनानेच सुरू केली. आरजू चे नवे रूप हे ‘ट्रॅव्हल पोर्टल च्या धाटणी होते. कुटुंबांसाठी सहल आयोजनाचे सर्वाधिक पसंतीचे टिकाण बनावे आणि सर्व पकारच्या पर्यटनविषयक सोयी एकाच ठिकाणी उपलब्ध कराव्यात अशा बेताने ‘आरजू’ ला त्यांनी नवे रूप दिले होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply