नवीन लेखन...

गृहनिर्माण संस्था आणि भांडवल उभारणी

सहकारी संस्थांना आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. तर गृहनिर्माण संस्थां कशाप्रकारे भांडवल उभारणी करू शकतात हे आपण आज या लेखातून समजून घेणार आहोत.

भाग भांडवल (Share Capital)

भाग भांडवल हे सहकारी संस्थेच्या अंतर्गत भांडवल उभारणीचे एक प्रमुख वित्तीय साधन आहे. भाग भांडवल हे संस्थेच्या मालकीचे भांडवल असते. भाग म्हणजे संस्थेच्या सभासदांचा एकूण भाग भांडवलातील लहान हिस्सा किंवा अंश होय. सहकारी संस्था जेव्हा भाग यांची विक्री करून भांडवल जमा करते तेव्हा त्याचाच “भाग भांडवल” असे म्हणतात. भाग धारण करणाऱ्या व्यक्तीस ‘भागधारक’ असे म्हणतात. संस्थेच्या उपविधीत अधिकृत भाग भांडवलाचा उल्लेख असतो. भाग भांडवल हे संस्था अस्तित्वात असेपर्यंत संस्थेत राहते.

प्रवेश शुल्क (Entrance fees)

सहकारी संस्था सभासदत्वाचा अर्ज भरून घेताना प्रवेश शुल्क आकारतात. प्रवेश शुल्काच्या माध्यमातून गोळा होणारी रक्कम फार अल्प असते. हे प्रवेश शुल्क साधारणपणे शंभर रुपये असते. संस्थेत जितके सभासद असतात त्या प्रमाणात प्रवेश फी जमा होते. प्रवेश शुल्क परत करावे लागत नाही. काही संस्था प्रवेश शुल्काची रक्कम राखीव निधीत जमा करतात. या रकमेचा वापर काही संस्था कायदेशीर गुंतवणुकीसाठी करतात.

राखीव निधी (Reserve fund)

प्रत्येक सहकारी संस्थेला दर वर्षी मिळालेल्या निव्वळ नफ्यापैकी १/४ म्हणजेच 25 टक्के इतकी रक्कम कायद्याप्रमाणे बाजूला काढून ठेवावी लागते, त्याला ‘राखीव निधी’ असे म्हणतात. ज्या संस्थेस आपल्या व्यवहारापासून नफा मिळतो किंवा नफा मिळू शकतो अशा प्रत्येक संस्थेने एक राखीव निधी ठेवला पाहिजे. कायद्यातील कलम ६६ मध्ये राखीव निधी विषयीची तरतूद आहे. सहकारी संस्था आपल्या गरजेनुसार व सोयीनुसार विविध प्रकारचे निधी उभारून राखीव निधी गरजेच्यावेळी वापरता येतो. राखीव निधीच्या प्रमाणावर संस्थेचे आर्थिक स्थैर्य अवलंबून असते. राखीव निधीमुळे संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम व भक्कम होत असल्यामुळे राखीव निधीला सहकारी संस्थेची ‘संरक्षक भिंत’ असे म्हणतात. संस्थेला कलम ७० च्या तरतुदींना अधीन राहून गुंतवता येते.

राखीव निधीशिवाय गृहनिर्माण संस्था घसारा निधी (Depreciation fund), बुडीत कर्ज निधी (Bad debt reserve fund), लाभांश समानीकरण निधी (Dividend equalization fund), शिक्षण निधी (Education fund) इत्यादी निधी उभारता येतात. राखीव निधीचा सर्वसामान्य परिस्थितीत वापर करता येतो. अन्य निधीचा वापर ते ज्या हेतूने तयार केले त्याच हेतूसाठी वापरले जातात.

— अ‍ॅड. विशाल लांजेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..